Viral Video: गाणारी गाढवीन तुम्ही कधी पाहिली आहे का?
गाणारी गाढवीन (Photo Credit: Facebbok)

साधारणपणे समजत नसलेल्या, ढ व्यक्तीला आपण गाढव असे म्हणतो. या प्राण्याकडेही बिनडोक, फक्त कष्ट करणारा प्राणी म्हणून आपण पाहतो. डोकं न वापरता काबाडकष्ट करणाऱ्यांसाठीही गाढव मेहनत, गधामेहनत हे शब्द प्रचलित आहेत. त्यामुळे गाढव या प्राण्याकडून कष्टाव्यतिरिक्त इतर काही होईल, असे आपल्याला वाटतही नाही. त्यात त्याचा आवाजही कर्णकर्कश. पण पुण्यातील एका ठिकाणी गाढवीन चक्क गाते गात असल्याचे समोर आले आहे. सुरेल आवाजात गाणे गाणाऱ्या या गाढवीणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात भलताच व्हायरल होत आहे.

तुम्हीही पाहा हा व्हिडिओ...

या गाढवाची देखभाल पुण्यातील एक स्वयंसेवी संस्था करते. या संस्थेला ही गाढवीण रस्त्यावर गंभीर अवस्थेत सापडली. त्यावेळेस तिने एका पिल्लाला जन्म दिला होता मात्र ते पिल्लू मेलेले होते. त्या अवस्थेत तिला संस्थेत आणण्यात आले. तिच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले. संस्थेत असलेल्या इतर गाढवांशीही तिची आता चांगली गट्टी झाली आहे. मात्र अचानक ही गाढवीन गाऊ लागली आहे.