Viral Video: सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. लग्न अनोखे करण्यासाठी लोक लग्नाच्या व्यवस्थेवर लाखो रुपये खर्च करत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे सध्याच्या काळात विवाह ही स्पर्धा बनली आहे. आजकाल लग्नसोहळा एखाद्या भव्य चित्रपट कार्यक्रमापेक्षा कमी नाही. आपल्या लग्नसोहळ्याच्या दिवसाला खास बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून जोडपी नवनवीन प्रयोग करताना दिसतात. अशातचं, एका नववधूने तिच्या लग्नात स्टेजवर अशी एन्ट्री केली, जे पाहून पाहुणे टेन्शनमध्ये आले. त्याचवेळी या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होताच इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये, नववधूने लग्नाच्या ठिकाणी ज्या प्रकारे प्रवेश केला, ते पाहून लोक वधू आणि तिच्या वडिलांसाठी चिंतेत असल्याचे दिसून आले. कारण वधूचा प्रवेश अत्यंत धोकादायक होता. हा व्हिडिओ पाहून लोकांमध्येही प्रचंड संताप व्यक्त होत आहे. व्हिडिओमध्ये वधू आणि तिचे वडील एका मोठ्या झुंबरात लग्नमंडपात प्रवेश करताना दिसत आहेत. वधू आणि तिचे वडील काही फूट वरच्या छताला जोडलेल्या झुंबराच्या मध्यभागी उभे असलेले दिसतात आणि झुंबर स्वतः पुढे जाताना दिसत आहे. नववधूला आपल्या वडिलांसोबत अशी एन्ट्री करताना पाहून काही पाहुण्यांच्या हृदयाचे ठोके बंद झाले. (हेही वाचा - Viral Video: गुजरातमधील अमरेली धारी येथे कुत्र्याचा पाठलाग करताना चुकून ATM मध्ये घुसले हरीण, पहा व्हिडिओ)
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नववधू तिच्या वडिलांसोबत लग्नमंडपाच्या काही फूट वर असलेल्या छताच्या झुंबरात उभी आहे आणि झुंबर पुढे सरकत आहे. अनेक पाहुणे वधू आणि तिच्या वडिलांची सुरक्षित स्टेजवर येण्याची वाट पाहत होते, तर अनेक पाहुणे खाली उभे राहून फोटो आणि व्हिडिओ बनवू लागले. मात्र, वधू स्टेजवर येईपर्यंत अनेकांनी श्वास रोखून धरला.
Please don't let this become a thing pic.twitter.com/rWRGsyENFp
— Fasi Zaka (@fasi_zaka) December 8, 2022
हा व्हिडिओ पाकिस्तानी हॉकी संघाचा माजी कर्णधार फासी झाका याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ 9 डिसेंबर 2002 रोजी शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर होताच, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि वापरकर्ते अशा धोकादायक घटनांवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.