कोणाचे दु:ख काय तर कोणाचे काय. जिलेबी म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अनेकांना मोह आवरणे कठीण. पण, तामिळनाडू (Tamil Nadu) येथील एका पोलीस (Tamil Nadu Police) अधिकाऱ्याला जिलेबी (Jalebi ) खाण्याबाबत समस्या आहे. या पोलीस अधिकारी महोदयांनी ट्विट केले आहे की, त्यांना त्यांची पत्नी जिलेबी (Wife And Jalebi) खाऊ देत नाही. आपल्या ट्विटमध्ये अत्यंत कष्टी होत त्यांनी म्हटले आहे की लहान होतो तेव्हा जिलेबीचा एक तुकडा 25 पैशांचा होता. तेव्हा वाटायचे मोठे झालो की खूप पैसे कमवायचे आणि खूप जिलेबी खायची. पण आता मोठे झालो तरीही दुर्दैवाने स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कारण पत्नी जिलेबी खायला परवानगी देत नाही.
अधिकारी संदीप मित्तल असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते आयपीएस दर्जाचे अधिकारी आहेत. ते ट्विटमध्ये म्हणातात लहानपणी 25 पैशाला एक जिलेबी यायची. तेव्हा विचार करायचो मोठा झाल्यावर खूप पैसे कमावणार आणि रोज तिन-चार जिलेबी खाणार. आता 'मोठा' झालो. पैसेही कमावू लागलो. पण आता पत्नी जिलेबी खावू देत नाही. (हेही वाचा, Rasgulla in Panchayat Elections 2021: उमेदवाराला रसगुल्ला भारी पडला, पोलिसांनी थेट कायदा दाखवला)
ट्विट
बचपन में २५ पैसे की एक बड़ी जलेबी आती थी। सोचते थे कि बड़े होने के बाद कमाएंगे और रोज़ तीन-चार जलेबी खाया करेंगे। अब कमाने लगे तो बीवी जलेबी खाने नहीं देती। pic.twitter.com/W9pxYWqnVY
— Dr. Sandeep Mittal, IPS (@smittal_ips) July 17, 2021
संदीप मित्तल यांचे ट्विट पाहता पाहता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. लोक आता त्यांच्या ट्विटर हँडलवर जाऊन भलत्याच कॉमेंट्स देऊ लागले आहेत. त्यातील काही भलत्याच मजेशीर आहेत. तर काही त्यांना सल्ला देणाऱ्या. पण यात एक फार महत्त्वाची कमेंट आहे. ही कमेंट त्यांच्या पत्नीने रिट्विट करुन दिली आहे. त्यांच्या पत्नीने म्हटले आहे की, ''आज तुम घर आओ...!'' हे वृत्त लिहूपर्यंत या ट्विटला 25,000 लाईक्स आले होते.