'Amit Shah Disowns Modi' Viral Message: व्हायरल होत आहे WhatsApp मेसेज ज्यामध्ये 9266600223 नंबर ब्लॉक करण्याचा दिला जात आहे सल्ला
Screenshot of viral message warning againt video called Amit Shah disowns Modi (Photo Credits: WhatsApp)

गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पंतप्रधान मोदींना (PM Modi) नाकारले' हा व्हिडीओ स्वीकारू नका असा व्हाट्सएप मेसेज सध्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपवर व्हायरल होत आहे. हॅकर्सनी उद्देशाने तयार केलेला हा संदेश फेसबुक आणि ट्विटर सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित केला जात आहे. हा मेसेज यूजर्सना एक विशिष्ट मोबाइल फोन नंबर ब्लॉक करण्यास सांगत आहे. व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप संदेशामध्ये असे लिहिले आहेकी, "कृपया अमित शहा यांनी मोदी नाकारले" हा व्हिडिओ स्वीकारू नये म्हणून आपल्या यादीतील सर्व संपर्कांना कळवा. हा एक व्हायरस आहे जो आपला मोबाइल फॉर्मेट करतो. हे खूप धोकादायक आहे. त्यांनी आज रेडिओवर ही घोषणा केली, तुम्हाला शक्य तितक्या लोकांना हा संदेश फॉरवर्ड करा. उच्च सतर्कता. कृपया हा नंबर 9266600223 ब्लॉक करा. ते क्रेडिट / डेबिट कार्ड हॅकर्स आहेत. कृपया आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना माहिती द्या." (Fact Check: देशातील सर्व राज्यात शाळा-कॉलेज सुरु करण्यास गृहमंत्रालयाची परवानगी? व्हायरल होणाऱ्या या बातमीवर गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण, जाणून घ्या सत्य)

खरं म्हणजे रेडिओवर अशी कोणतीही घोषणा केली गेली नाही. जर व्हायरस इतका धोकादायक असेल तर सरकारने अनेक प्लॅटफॉर्मवर ही घोषणा केली असती. यापूर्वी, 2017 मध्ये "सोनियाने राहुलला नाकारले" या शीर्षकासह एक मेसेज व्हायरल झाला होता. त्यावेळीसुद्धा तथ्य-तपास यंत्रणांना हे बनावट असल्याचे समजले होते.

बनावट बातम्यांचा आणि चुकीच्या माहितीचा महापूर आल्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक राजकारणी, सेलिब्रिटी आणि नुकत्याच झालेल्या कोरोना व्हायरसच्या उद्रेकांबद्दलच्या चुकीच्या मेसेजेसचे शिकार बनले आहेत. वाचकांना सल्ला दिला जातो की व्हॉट्सअ‍ॅप,फेसबुक आणि ट्विटरवर मिळालेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. सत्यापित बातम्या आणि अद्यतने मिळवण्यासाठी Marathi.latestly.com ला भेट द्या.