Wedding Viral Video: लग्नाच्या मांडवातच नवरीला डुलकी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटीझन्सकडून मजेशीर प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ
Wedding Viral Video | (Photo Credits-Instagram)

विवाहसोहळा (Wedding) ही आपल्या संस्कृतीतील सर्वात रोमांचक गोष्टींपैकी एक आहे. त्यामुळे आपल्या समाजात भव्यदिव्य विवाहसोहळे आयोजित करण्यास नेहमीच प्राधान्य दिले जाते. विशेष म्हणजे काळ, स्थळ, प्रांत, समाज आदिंच्या चालिरीतींनुसार हे सोहळे प्रदीर्घ काळ चालतात. त्यामुळे लग्नाच्या मांडवात इतरही अनेक मजेदार घडामोडी घडतात. त्यातील काही सोशल मीडियावर व्हायरल (Wedding Viral Video) होतात. आताही सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Husband Wife Video) झाला आहे. जो पाहून कदाचित आपल्यालाही असू येईल.

प्रदीर्घ काळ चालणारे विवाह सोहळे हा एक खरेतर कंटाळवाणा कार्यक्रम ठरतो. कारण, प्रत्यक्षात या कार्यक्रमात जे लोक गुंतलेले असतात किंवा जे या कार्यक्रमात प्रमुख उत्सवमूर्ती असतात त्यांच्यासाठी हे सोहळे अत्यंत थकवा आणणारे असतात. कारण, अशा सोहळ्यांतील विधी कित्येक तास चालू शकतात. काहीवेळा, फंक्शन्स मध्यरात्री सुरू होतात आणि सूर्य उगवल्यावर पूर्ण होतात. यामुळे कुटुंबांची दमछाक होते. असंच काहीसं दाखवणारा एक व्हिडिओ इंटरनेटवर फिरतो आहे. (हेही वाचा, Bhiwandi Fire at Wedding Viral Video: लग्नमंडपामध्ये आग भडकली असताना पाहुणा जेवणावर ताव मारण्यात दंग; पहा वायरल व्हिडिओ)

सोशल मीडियावर @batteredsuitcase या Instagram युजरने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही वधू मंडपावर बसलेली पाहू शकता. लग्नातील विधी बहुदा बराच काळ सुरु असल्याने ती चांगलीच थकलेली दिसते. त्यामुळे तिला स्टेजवरच झोप येऊ लागली. गंमत म्हणजे वधूने स्टेजवरच एक छोटीशी झोपही काढली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, वधूने लिहिले की, "येथे झोपलेली वधू (मी) आली आहे. जेव्हा सकाळचे 06:30 वाजले आहेत आणि लग्न अजूनही चालू आहे."

ट्विट

हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत सात लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओला 16,000 लाईक्स आणि अनेक कमेंट्स देखील आहेत. अनेक नेटिझन्सनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे. एका व्यक्तीने लिहिले, "लग्नाच्या दिवसाआधी तिला चांगली झोप लागली असेल अशी आशा आहे, कधी कधी काही नववधूंना भूक लागते, सकाळी जेवत नाही." दुसर्‍या व्यक्तीने लिहिले की, "सर्वात सुंदर वधू आणि रिलेटेबल आहे. मी तिच्याशी पूर्णपणे रिलेट करू शकते." तिसरी व्यक्ती म्हणाली, "माझ्या लग्नातही असेच घडले होते." चौथी व्यक्ती म्हणाली, "ती खूप थकलेली दिसत आहे. तिला झोपू द्या."