Wedding Video | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लग्नाच्या मंडपात (Wedding Viral Video) अनेक मजेशीर घटना घडतात. त्यातील अनेक चर्चेचा विषय ठरतात. आजकाल जमाना डिजिटल मीडियाचा आहे. त्यामुळे अशा घटना सोशल मीडियावरही (Social Media) व्हायरल होतात. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील अमरोहा (Amroha) जिल्ह्यातील एका लग्नात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. इथे आलेल्या हसनपूर येथे दोन बहिनींची एका मंडपात लग्ने होत होती. या वेळी जेवणाच्या ठिकाणी मंडपात प्रवेश करण्यापूर्वी वऱ्हाडी मंडळींना 'आधार' कार्ड ( Aadhaar Card) मागण्यात आले. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची चांगलीच पंचायत झाली.

लग्नाला झालेली गर्दी पाहून लग्नमालक चांगलेच हादरुन गेले. कारण, या गर्दीत अनोळखी चेहरे मोठ्या प्रमाणावर दिसत होते. त्यामुळे जेवणाच्या ताटांची दिलेली ऑर्डर आणि झालेली गर्दी याचा ताळमेळ बसणे कठीण दिसले. परिणामी लग्न मालकांनी शक्कल लढवली. त्यांनी पाहुण्यांना जेवणाच्या ठिकाणी प्रवेश देण्यापूर्वी त्यांचे आधार कार्ड दाखवण्यास सांगण्याचा निर्णय घेतला. काही पाहुण्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. जो आता व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Viral Video: केरळमधील नववधूने खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर केले खास फोटोशूट; Watch)

ट्विट

लग्नमालकांनी आधार कार्ड दाखविण्याचा निर्णय ऐनवेळी घेतल्याने वऱ्हाडी आणि पुहूणे मंडळींची चांगलीच गोची झाली. बहुतांश पाहुण्यांनी आधार कार्ड सोपत आणलेच नव्हते. काही तर वर किंवा वधू पक्षाच्या अगदीच जवळचे होते. पण, तरीही त्यांना आधार कार्ड दाखविण्यास सांगण्यात आल्याने बहुतेकांची गोची झाल्याचे पाहायला मिळत होते. अनेक पाहुण्यांनी आधार कार्ड दाखवणे हा आपला अपमान आहे असे मानले आणि त्यांनी भोजनगृहात न जाणे पसंत केले. दुसऱ्या बाजूला काही पाहुण्यांनी विवाहस्थळच सोडल्याची घटना घडली. ज्यांच्याकडे आधार कार्ड होते त्यांनी मात्र भोजनावर चांगलाच आडवा हात मारला. वरुन तृप्तीची ढेकरही दिली. आधारकार्डचा प्रसंग मात्र जोरदार चर्चेत राहिला.