Viral Video TWITTER

Viral Video:  फोनवर बोलण्याच्या नादात आईने असं काही केलं ज्यामुळे नेटकरी व्हिडिओ पाहून संतापले आहे.  सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, घरात असलेली आई तीच्या लहानग्या मुलासोबत दिसते. आईवर फोनवर नातेवाईकांशी बोलताना दिसते. त्यानंतर स्वयंकपाक घरातून भाजी कापण्यासाठी भाजी आणि चाकू घेऊन येते. त्यानंतर थोड्यावेळाने बाळाला हातात घेते आणि फ्रीजकडे वळते. फ्रीजपाशी येऊन दरवाजा उघडते आणि बाळाला फ्रीजमध्ये ठेवते.(हेही वाचा- ट्रेनच्या सीटवर सामान ठेवल्यामुळे दोघांमध्ये पेटला वाद,Video व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली प्रतिक्रिया)

ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होते. काही वेळाने आतल्या खोलीतून मुलाचे बाबा येतात. बाळाला शोधण्याचा प्रयत्न करतात पण घरातच आजू बाजूला असल्याचे त्यांना संशय येतो. त्यानंतर पुन्हा काही वेळाने घरातून बाळाच्या रडण्याच्या आवाज येतो. बाळाला घरात शोधण्याचा प्रयत्न सुरु होतो. परंतु बाळ काही सापडत नाही. फ्रीजपाशी गेल्यावर समजते. बाळाचा आवाज फ्रीमधून येत आहे.

फ्रीजचा दरवाजा उघडल्यावर बाळ आत असल्याचे दिसून येते. यानंतर मुलाच्या बाबाने बाळाला बाहेर काढले. बाळ सुखरूप असल्याचे दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओला अनेकांनी कंमेट केले आहे. युजर्संनी आईवर संताप व्यक्त केला आहे. फोनच्या व्यसनामुळे आईने असं कृत्य केल्याचे दिसून येत आहे.