Viral Video: भारतीय महिला Asha Rani ची कमाल; फक्त केसाने ओढली 12,216 किलो वजनाची डबल डेकर बस; Guinness World Record मध्ये झाली होती नोंद
Asha Rani (Photo Credit : Instagram)

भारतीय महिला आशा राणीच्या (Asha Rani) नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) आहे. आशा राणीने 2016 मध्ये लंडनमध्ये आपल्या केसाने 12,216 किलो वजनाची डबल डेकर बस ओढून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने आशा राणीचा 2016 चा हा व्हिडिओ पुन्हा शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पुन्हा पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. आशा राणीचा हा व्हिडिओ 4 जानेवारी 2021 रोजी 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'च्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओ शेअर करताना 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'ने लिहिले की, ‘12 हजार 216 किलो वजनाचे सर्वात वजनदार वाहन आशा राणीने केसांनी ओढले होते.’ व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आशा राणीने दोन वेण्या बांधल्या असून, वेणीमध्ये एक दोरी आहे. आशा राणी या दोरीच्या सहाय्याने 12,216 किलो वजनाची डबल डेकर बस ओढत आहे. अवघ्या काही सेकांदामध्ये आशा आपला विक्रम पूर्ण करते. तिचा रेकॉर्ड पूर्ण होताच ती भावूक झाल्याचेही दिसत आहे. (हेही वाचा: Whale Jumps on Boat Video: पाण्यातून बोटीकडे झेपावला व्हेल मासा, थोडक्यात वाचले लोकांचे प्राण (पाहा व्हिडिओ)

इटलीच्या मिलान शहरात ‘Lo Show dei Record’ च्या सेटवर लंडनची डबल डेकर बस ओढल्याबद्दल आशा राणीचा ‘आयर्न क्वीन’ म्हणून गौरव करण्यात आला होता. राणीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. सध्या तिच्या नावावर सात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, राणीने यापूर्वी 2014 मध्ये यूकेच्या लीसेस्टरमध्ये 'दोन्ही डोळ्यांच्या सॉकेट्स’सह (महिला) सर्वात जास्त वजन उचलण्याचा' विक्रम केला होता. आशा एक वेट लिफ्टर आहे आणि वेट लिफ्टिंगशी संबंधित तिच्या या विशेष कौशल्यामुळेच ती हा पराक्रम सहज करू शकली.