Viral video: गेल्या काही दिवसांपासून बाहेरील खाद्यपदार्थांमध्ये आणि ऑनलाइन ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये कीटक आढळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली असून ग्राहकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे प्रकरण गाझियाबाद येथील राजनगर एक्स्टेंशनचे आहे. येथे एका ग्राहकाने श्री धारा डेअरीमधून समोसा घेतला, तो खाताना समोसामध्ये मृत स्पायडर दिसला. या घटनेनंतर ग्राहकानेही याबाबत डेअरी चालकाला माहिती दिली व त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला असून दुकानदारावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्राहकाने केली आहे. हे देखील वाचा: Richa Ghosh Catch Video: रिचा घोषने विकेटच्या मागे घेतला अप्रतिम झेल, व्हिडिओ झाला व्हायरल
समोसामध्ये मृत स्पायडर सापडला
गाजियाबाद में समोसे में मेंढक की टांग के बाद अब निकली मकड़ी....खाते-खाते अचानक दिखी तो उड़ गए होश pic.twitter.com/1Ry1GNqVei
— Raju Sharma (@RajuSha98211687) October 7, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, यश अरोरा नावाच्या व्यक्तीने राजनगर एक्स्टेंशनजवळील श्री धारा डेअरीमधून समोसा खरेदी केला होता. जेवताना त्याला बटाट्याला चिकटलेल्या समोशामध्ये मेलेला स्पायडर दिसला. तो समोसाही त्याने दुकानदाराला दाखवला.
काही महिन्यांपूर्वी आइस्क्रीममध्ये मानवी बोट सापडले होते, त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेसच्या खाद्यपदार्थातही अळी सापडली होती, काही दिवसांपूर्वी गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील एका मोठ्या मिठाईच्या दुकानात समोस्यांमध्ये बेडकाचा पाय सापडला होता. यानंतर पोलिसांनी दुकानदारालाही ताब्यात घेतले. @RajuSha98211687 या हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.