Viral Video: नवरीच्या अपंग बहिणीला उचलून नवरदेव लग्नाच्या स्टेजवर घेऊन गेला, व्हायरल व्हिडिओने जिंकली सर्वांची मने
(Photo Credit: Twitter)

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. त्यापैकी काही व्हिडिओ हृदयाला हलवून, खिळवून टाकतात. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओ नवरदेव हा नवरीच्या अपंग बहिणीला उचलून लग्न मंडपात घेऊन जाताना दिसत आहे. मॉर्गन अल्टेयरने तिच्या लग्नाच्या दिवसाचा हा खास क्षण शेअर केला आहे. तिची जुळी बहीण मॅसीसोबत तिच्या पतीचा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मॅकी, हीची नेहमीच विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच तिलाही नवरीप्रमाणे क्षण घालवण्याची इच्छा होती, असेही तिने म्हटले आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "माझी जुळी बहीण, तिची नेहमी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जो आता माझा नवरा आहे, त्याने आमच्या लग्नात माझ्या बहिणीला उचलून स्टेजवर घेऊन आला. हे मी कधीच विसरणार नाही. त्याच्यातील याच गुणांमुळे मला त्याच्याशी प्रेम झाले. मी जितके त्याच्यावर प्रेम करते, तेवढेच प्रेम तोही माझ्यावर करतो. हे देखील वाचा- Viral Video: आयस्क्रिम-चॉकलेट वापरुन डोसा तयार केला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल, युजर्सने दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

ट्वीट-

हा व्हिडिओ प्रचंड वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 30 हजारांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. तसेच या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.