Viral: लग्नातील जेवण पाहून भडकले लोक, लहान मुलांचे खाणे दिल्याचे म्हणत व्यक्त केला संताप
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Viral: लग्न म्हटले की धावपळ, खुप शॉपिंग आणि सर्वजण एकत्रित भेटत असल्याने आनंद द्विगुणित होतो. मात्र लग्नातील जेवण हा सुद्धा एक त्यातीलच एक महत्वाचा मुद्दा असून त्यावर ताव मारण्यासाठी तर काहीजण तुटून पडतात. परंतु जर तुम्हाला लग्नाचे आमंत्रण हे मोठ्या दिलाने दिल्यानंतर तुम्ही त्यासाठी आलात आणि तुम्हाला जेवण म्हणून चिप्सचे पॅकेट दिले तर तुमचे काय होईल? प्रत्येकाला यावरुन राग येणे सहाजिकच आहे. असाच प्रकार एका लग्नात घडला आहे.

द सन यांच्या रिपोर्ट्सनुसार, ब्राइड्समेड म्हणेज नववधुच्या मैत्रीणीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने वेडिंगच्या डिनरचा फोटो शेअर केल्यानंतर असे दिसून आले की, त्यामध्ये एक चिप्सचे पॅकेट, फ्रुट स्टिक आणि अर्धे क्रॉसेंटसह काही सलाड दिले गेले होते. वेडिंगच्या डिनरसाठी अशा प्रकारचे जेवण दिल्याने लोक भडलकी. त्यांनी हे लहान मुलांचे खाणे असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला. लग्नाला उपस्थितीत लावलेल्या एका व्यक्तीने ते जेवणातील चिप्सचे पाकिट काढून टाकत अन्य गोष्टी आपल्या मुलाला त्याच दिवशी लंच म्हणून दिले.(Desi Jugaad Video: डोक्यावरील केस कापण्यासाठी व्यक्तीचे लढवली शक्कल, गवत कापण्याच्या मशीनचा वापर केल्याचे पाहून लोक झाले हैराण)

नववधुच्या मैत्रीणीने जेवणावरुन टीका केलीच पण तिने पुढी लग्नातील एकूण जी काही व्यवस्था केली होती त्यावर ही तिने संताप व्यक्त केला. तिने असे म्हटले की, लग्नातील खुर्च्या पण नीट ठेवण्यात आलेल्या नव्हत्या. तसेच त्यांचा रंग सु्द्धा विचित्र होता. या फेसबुक पोस्टवर एका युजरने कमेंट केली की, वेडिंग डिनरच्या नावाखाली चिप्स! मला कळत नाही की, मी हसू की रडू. तसेच अन्य एका युजरने लिहिले की, त्यांनी कमीत कमी क्रॉसेंट तरी पूर्ण द्यायचे होते.