Desi Jugaad Video: डोक्यावरील केस कापण्यासाठी व्यक्तीचे लढवली शक्कल, गवत कापण्याच्या मशीनचा वापर केल्याचे पाहून लोक झाले हैराण
Desi Jugad For Hair Cut (Photo Credits-Instagram)

Desi Jugaad Video:  सोशल मीडियात नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींचे फोटो किंवा व्हिडिओ खुप व्हायरल होत असतात. प्रत्येकजण आपली क्रिएटिव्ही दाखवण्यासाठी वाटेल ते करतो. पण त्यात ही काहींना ट्रोल केले जाते. अशातच आता सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून त्यात, एका व्यक्तीने डोक्यावरील केस कापण्यासाठी चक्क गवत कापण्याच्या मशीनचा वापर केला आहे. त्याची ही केस कापण्याची शक्कल पाहता लोक हैराण झाले आहेत.

इंस्टाग्रामवर desi_swaad0 नावाच्या पेजद्वारे शेअर करण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1.5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ गेल्या वर्षात एप्रिलमध्ये शेअर केलेला आहे. परंतु तरीही त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यावर लोकांनी विविध प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, अशा पद्धतीने कोण केस कापतात? तर अन्य एकाने म्हटले, जुगाड तर असे किती पाहिले पण अशा पद्धतीचा कधीच पाहिला नव्हता. (Viral Video: आयस्क्रिम-चॉकलेट वापरुन डोसा तयार केला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल, युजर्सने दिल्या 'अशा' प्रतिक्रिया) 

 

View this post on Instagram

 

A post shared by Desi Swaad (@desi_swaad0)

व्हायरल झालेल्या व्हिडिओत असे दिसून येते की, एक व्यक्ती आराम बसला असून दुसरा व्यक्ती त्याच्या केसांवरुन गवत कापण्याची मशीन फिरवत आहे. केस कापणाऱ्या व्यक्तीला त्याची जरा सुद्धा भीती वाटत नाही आहे. मात्र हा व्हिडिओ कोणत्या गावातील आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.