नरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)
Modi fan's dancing video goes viral (Photo Credits: Facebook/ Trending Delhi)

भारत आणि पाकिस्तानमध्ये अतिशय रोमांचकारक असा वर्ल्डकप 2019 (ICC cricket world cup 2019) सामना पार पडला. भारताने ज्या प्रकारे पाकिस्तानचा धुव्वा उडवला त्याला तोड नाही. या सामन्यानंतर अनेक फोटो, मीन्स, व्हिडिओज व्हायरल झाले. यामुळे इन्टरनेट अचानक एक ‘फन प्लेस’ बनली.  यामध्ये सध्या एक व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. नरेंद्र मोदी यांचा मास्क घालून भारतीय चाहता अतिशय मदमस्त होऊन डान्स करत आहे. पाकिस्तानी ‘Nach Punjaban’ या गाण्यावरील या नृत्याला आतापर्यंत खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

क्रिकेट सामन्यादरम्यान, मोदी जॅकेट, कुर्ता आणि मोदींच्या चेहऱ्याचा मास्क घालून हा व्यक्ती डान्स करत आहे. नृत्य करत ज्या प्रकारे ही व्यक्ती भारतीय संघाला प्रोत्साहन करत आहे ते पाहून अनेकांनी या व्यक्तीचे कौतुक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओची आपली आवड लाईक्स आणि कमेंटद्वारे व्यक्त केली आहे. (हेही वाचा: 'Sarfraz तू जाडा आहेस', संतापलेल्या पाकिस्तानी चाहत्यांनी फिटनेसवरुन केली कर्णधाराची 'टिंगल')

मात्र या व्हिडिओवरून हा नक्की कोणत्या सामन्यादरम्यानचा आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र हा व्हिडिओ भारत पाकिस्तानच्या 16 जून रोजी पार पडलेल्या वर्ल्ड कप सामन्यादरम्यानचा असावा असा अंदाज लावला जात आहे.