Usha Soman 81st Birthday: मिलिंद सोमणची आई उषा सोमण यांनी 15 पुशअप्स घालत साजरा केला आपला 81 वा वाढदिवस; पहा तरुणांनाही लाजवेल असा Video
Usha Soman 81st Birthday (Photo Credit: Instagram)

सुपर मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) याची आई उषा सोमण (Usha Soman) यांनी 3 जुलै रोजी आपला 81 वा वाढदिवस (81st Birthday) साजरा केला. यावर्षी त्यांना झांबियामध्ये बंजी जंपिंगला जायचे होते, पण कोरोना व्हायरस साथीच्या रोगामुळे ते शक्य झाले नाही. यंदा त्यांनी आपला वाढदिवस घरीच आपल्या परिवारासह साजरा केला. मात्र आपल्या बंजी जंपिंगची कसर भरून काढण्यासाठी त्यांनी चक्क या वयातही 15 पुशअप्स (Push-Ups) मारले. मिलिंद सोमण याने आपल्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. अगदी तरुणानन लाजवेल असा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना मिलिंद सोमण लिहितो, '3 जुलै 2020 रोजी, लॉकडाऊनमध्ये आईचा 81 वा वाढदिवसासह साजरा झाला. 15 पुशअप्स आणि अंकिताने बनवलेला जॅगरी व्हॅनिला अलमंड केकसह पार्टी साजरी झाली. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ या पोस्टमध्ये मिलिंदच्या आईने तिच्या वाढदिवसा दिवशी 15 पुश-अप केलेले दिसत आहेत. दुसर्‍या एका फोटोमध्ये मिलिंद, अंकिता आणि त्याची आई दिलखुलास हसत जॅगरी व्हॅनिला अलमंड केक एन्जॉय करताना दिसत आहेत. (हेही वाचा: आयर्न मॅन मिलिंद सोमण ने घरच्या घरी पिकवला भाजीपाला; पहा खास व्हिडिओ)

पहा व्हिडिओ -

या व्हिडिओ खाली अनेकांनी केमेंट्स करत उषा सोमण यांच्या एनर्जीचे कौतुक केले आहे. काल अंकितानेही ‘81, fit and fabulous!’ असे म्हणत एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या सासूच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. उषा सोमण या 81 व्या वयातही एक फिट महिला आहेत. मिलिंद सोमण सोबतचे त्यांचे अनेक फिटनेस व्हिडिओ या आधी व्यायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मिलिंदने त्यांच्या घरी व्यायामाचा प्रकार म्हणून उषा यांचा दोरी वरच्या उड्यांचा व्हिडिओ शेअर केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी उषा सोमणचा यांचा अजून एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये त्या आपली सून अंकिता कुंवरसोबत लंगडी घालताना  दिसल्या होत्या. महत्वाचे म्हणजे त्यांचे हे सर्व व्हिडिओ साडीमधील आहेत.