सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता आणि आयर्न मॅन मिलिंद सोमण (Milind Soman) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. मिलिंद सोशल मीडियावर आपले फिटनेस फोटो तसेच वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. दरम्यान, मिलिंद सोमणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोमणने घरच्या घरी काही फळभाज्यांची शेती (Farming Video) केलेली पाहायला मिळत आहे. यात त्याने काकडी आणि दोडका हातात घेऊन फोटो शेअर केला आहे.
या व्हिडिओजमधून मिलिंद सोमणला फिटनेससोबत गार्डनिंगचीही आवड असल्याचं पाहायला मिळतयं. मिलिंद सोमणने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटल आहे की, 'अखेर एक लांब दाढी असलेला शेतकरी, अंकिताची इच्छा होती. स्वत:च्या हाताने उगवलेल्या भाज्या खाण्यात खरंच एक आनंद आहे. लॉकडाउनमध्ये एक लहानसं ग्रीन हाऊस, भाज्यांचं घरं मी उभा केलं,' असंही सोमणने म्हटलं आहे. (हेही वाचा - Gulabo Sitabo Movie Review: अमिताभ बच्चन व आयुष्मान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ चित्रपट ‘या’ कारणांसाठी जरूर पहा; उत्तम अभिनय, दिग्दर्शनासोबत लपला आहे सामाजिक संदेश)
मिलिंद सोमणचा फिटनेस सर्वचं तरुणांना प्रेरणा देणारा आहे. वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही मिलिंद सोमण आजही तितकाच फिट आहे. तरुणांना लाजवेल अशी त्याची बॉडी आणि फिटनेस आहे. मिलिंद अनेकवेळा त्याच्या वर्कआऊटचे व्हिडिओ पोस्ट करतो आणि त्याच्या चाहत्यांना हे वर्कआऊट करण्यासाठी चॅलेंज देत असतो. मिलिंद बरोबरचं त्याची पत्नी अकिंतादेखील तितकीचं फिट आहे.