तरुणी जोरात शिंकली आणि... नाकातून निघाली अशी गोष्ट पाहून लोक झाली थक्क
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्वीटर)

United Kingdom: युनाडेट किंग्डम येथे राहणारी अबिगेल थॉम्पसन (Abigail Thompson) नावाच्या तरुणीने तिच्या आयुष्याशी निगडीत एका रहस्यमय घटनेचा खुलासा केला आहे.त्यामुळे तरुणीनीने सांगितलेली ही घटना ऐकून लोक थक्क झाले. अबिगेल अनुसार 2007 रोजी तिच्या 8 व्या वाढदिवसाच्या दिवशी तिला आईने एक सुंदर अंगठी गिफ्ट म्हणून दिली होती. मात्र ती कालांतराने हरविली होती. तसेच आईने गिफ्ट दिलेली अंगठी घरातसुद्धा शोधून मिळाली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी अबिगेल हिला आपल्या नाकात चमकदार वस्तु दिसू लागली. त्यामुळे अबिगेल जोरात शिंकल्यावर ती थक्क झाली. कारण 12 वर्षांपूर्वी हरविलेली अंगठी तिच्या नाकातून शिंकण्यामुळे बाहेर पडली आहे.

Metro UK सोबत बोलताना अबिगेलने असे म्हटले की, आईने मला वाढदिवसानिमित्त अंगठी गिफ्ट दिली होती. काही महिन्यानंतर ती हरवली. मात्र नाकात अंगठी अडकली असल्याचा मी कधीच विचार केला नाही. माझ्या सोबत काही मित्रमैत्रिणी होते त्यांच्यावर मी अंगठी चोरल्याचा संशय घेत असे. तर अबिगेल ही युनायटेड किंग्डम येथील यॉर्कशायर (Yorkshire) येथे राहते. (हेही वाचा-101 व्या वर्षी तिने 'आई' होण्याची इच्छा केली पूर्ण; जाणून घ्या काय आहे सत्यता)

अबिगेल थॉम्पसन (Photo Credit: Twitter/ Ramazan Yalçın)

थॉम्पसन हिने पुढे असे सांगितले की, मी घरातील पलंगावर बसली होती. त्यावेळी शिंका येत असल्यामुळे एक कपडा नाकात घालण्याचा प्रयत्न केला. मात्र नाकामध्ये चमकदार वस्तू दिसू लागली. त्यामुळे ती वस्तू काय आहे पाहण्यासाठी जोरात शिंकली तेव्हा कपडा उघडून पाहिल्यावर मला 12 वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी मिळाल्याचे सांगितले आहे. 2007 रोजी तिला नाकासंबंधित कोणताही त्रास जाणवला नाही. ती मोकळेपणाने श्वास घेऊ शकत होती. तसेच इतक्या वर्षात मी कधीच डॉक्टरांकडे जाऊन श्वासोच्छश्वासासंबंधित उपचार घेतले नसल्याचे अबिगेल हिने स्पष्ट सांगितले आहे,