Anatolia Vertadella (Photo Credits: You Tube)

सध्या व्हायरल गोष्टींचा जमाना आहे. व्हिडिओ, फोटो यांसोबत काही बातम्याही प्रसारित करून लोक व्हायरल होण्याचा प्रयत्न करतात. मात्र या गोष्टी खऱ्या आहेत का खोट्या यांचा शोध घेणे अवघड होते. आता हीच घटना पहा, 'वैद्यशास्त्रालाही आश्चर्यचकीत करणारी घटना; इटलीमध्ये एका महिलेने वयाच्या 101 व्या वर्षी बाळाला जन्म दिला.' अशा आशयाची ही 2017 या सालातील बातमी होती. लोकांना आश्चर्यचकित करणारी ही घटना बघता बघता व्हायरल झाली.

इटलीत राहणार्‍या अनातोलिया व्हर्टाडेला (Anatolia Vertadella) या महिलेने ओव्हरी ट्रान्सप्लान्ट करून बाळाला जन्म देण्याची इच्छा पूर्ण केली आहे. अनातोलिया या महिलेने ओव्हरी इंम्पप्लॅन्टेशन केल्यानंतर 9 पौंड वजनाच्या एका बाळाला जन्म दिला. अंडाशयाच्या प्रत्यारोपण टर्की येथील एका खाजसी क्लिनिकमध्ये करण्यात आलं. ही शस्त्रक्रिया अत्यंत चर्चेचा विषय ठरली होती. ब्राझीलमध्ये मृत महिलेच्या गर्भाशय दानातून गोंडस चिमुकलीचा जन्म, वैद्यकीय इतिहासातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

मात्र आम्ही जेव्हा या गोष्टीचा शोध घेतला तेव्हा ही बातमी चक्क खोटी (Fake) असल्याचे निदर्शनास आले आहे. होय, अशी कोणतीही घटना इटलीमध्येच नाही तर जगाच्या पाठीवर कुठेही घडली नाही. याआधीही उत्तर प्रदेश सरकार कुंभमेळ्यादरम्यान कंडोम वाटणार अशी बातमी आली होती. मात्र जेव्हा सत्यता पडताळून पहिली तेव्हा ती बातमी खोटी निघाली.