Uncle Riding Unique Monocycle: गुजरात येथील एका काकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. हे काका हटके स्टाईलमध्ये आपली मनोसायकल चालवत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्सीन या काकांचे वर्णन 'टाईम ट्राव्हलर' असे केले आहे. या मोनोसायकलचे वैशिष्ट्य असे की, ती एका मोठ्या टायरने अच्छादली आहे. आगोदर सायकलची चाके फिरतात आणि मग त्याद्वारे हा एकच मोटा टायर फिरतो. ज्यामुळे ती पुढे सरकण्यास मदत होते. कदाचित आपण थोडे गोंधळला असाल. कारण 'आगोदर चाके फिरतात आणि मग टायर फिरतो' याचा नेमका अर्थ काय? त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच पाहावा लागेल. कारण ते शब्दांमध्ये सांगून समजणार नाही. आणि समजविण्याचा प्रयत्न जरी केला तरी, ते केवळ औपचारिक होईल.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ iamsuratcity नावाच्या हँडलवर 31 जुलै रोजी शेअर करण्यात आला. शेअर करण्यात आल्यापासून अल्पावधीतच या हा व्हिडिओ व्हायरल झाला. आतापर्यंत हा व्हिडिओने जवळपास 8.3 लाखांहून अधिक पेज व्हिव्ह प्राप्त केले आहेत. हे वृत्त लिहिपर्यंत व्हिडिओला 366,810 likes मिळाले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे. अनेकांनी या मोनोसायकलचे मनपूर्वक कौतुक केले आहे. काहींनी तिला Gyrocycle म्हटले आहे.
व्हिडिओ पाहून एका यूजर्सने म्हटले आहे की, काकांनी तर फारच गांभीर्याने घेतलेले दिसते. दुसऱ्याने म्हटले आहे की, काहा हे भविष्यातील टाईम ट्राव्हलर आहेत. तिसरा म्हणतो खूपच छान. पण, काका पावसात कसे? कारण चिखलातून सायकल चालवताना सगळा चिखल डोक्यावर येणार. अनेकांनी दावा केला आहे की, काकांनी 'ब्लॅक-2' चित्रटातून प्रेरणा घेतली आहे.
सोशल मीडिया हा एक वैविध्यपूर्ण संकल्पनांचा कोलाज आहे म्हटले तर हरकत नसावी. समुद्राचा जसा तळलागत नाही. तसाच सोशल मीडियाचाही तळ लागत नाही. एकदा का एखादी गोष्ट सोशल मीडियावर आली की, ती कुठे आणि किती पसरेल याबाबत काहीच सांगता येत नाही. तसेच, सोसल मीडियावर अनेकांच्या कल्पानाशक्तींना बहर येतो. अनेक लोक काहीतरी असे कलात्मक सादर करतात की ते कौतुकासपात्र ठरतात.
व्हिडिओ
View this post on Instagram
अर्थात, सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार. जर तुम्हाला ती योग्य पद्धतीने वापरा आली तर तुम्ही केवळ लोकप्रियताच मिळवत नाही. तर त्यासोबत चांगल्या दर्जाची अर्थप्राप्तीही करु शकता. पण, तुम्ही त जर वापरण्यास चुकलात तर पोलिसांच्या बेड्या पडल्याच म्हणून समजा. सोशल मीडियाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मीडिया तुम्हाला रातोरात प्रसिद्ध करण्याची क्षमता ठेवतो. तुमची कला सादर करण्यासाठी आता कोणा तिसऱ्या मध्यस्थाची मुळीच गरज नाही. तुम्हीच तुमची कला लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकता.