आपण 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज' या चित्रपटाबाबत एकलेच असेल, ज्यामध्ये जॅकी चॅनने मुख्य भूमिका साकारली होती. 1872 मध्ये जूल्स व्हेर्न यांनी लिहिलेल्या कादंबरीवर या चित्रपटाची कहाणी बेतलेली होती. त्यावेळी एवढ्या कमी वेळात एखादा माणूस संपूर्ण जगाचा प्रवास करू शकेल अशी कल्पनाही कोणी केली नसेल, मात्र आता ही गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. अतिशय कमी वेळात 7 खंडांचा प्रवास केल्याबाबत एका महिलेचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंदवले गेले आहे. या महिलेचे नाव डॉ. खावला अलरोमाथी (Dr Khawla AlRomaithi) आहे.
अलरोमाथी यांनी 3 दिवसांत सात खंडांचा व 208 देशांचा प्रवास केल्याबाबत विक्रम नोंदविला आहे. त्यांनी केवळ 3 दिवस 14 तास 46 मिनिटांत ही कामगिरी केली आहे. अलरोमाथी यांनी आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर अधिकृत प्रमाणपत्रसह एक पोस्ट देखील शेअर केली आहे. डॉ रोमाथी यांनी 10 फेब्रुवारी 2020 रोजी युएईहून आपली यात्रा सुरू केली होती व 13 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे त्यांचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी आपले नाव गिनीज बुक रेकॉर्डला पाठविले. (हेही वाचा: Viral Video: तरुणांनाही लाजवेल असा आज्जीबाईंचा नदीत स्वच्छंद पोहतानाचा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, नक्की पाहा)
आपल्या प्रवासाबाबत रोमाथी सांगतात, ही संपूर्ण यात्रा त्यांच्यासाठी खूप कठीण होती. बर्याच वेळा रोमाथी यांना या प्रवास संपवून परत घरी जावेसे वाटले, मात्र अशावेळी त्यांच्या कुटूंबाच्या आणि मित्रांच्या विश्वासाने त्यांना धैर्य दिले आणि त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला. इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'मी नेहमीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची चाहती होती. आता मागे पळून पाहताना मला माझा प्रवास आठवतो व अशावेळी हे प्रमाणपत्र घेणे फारच जड वाटले.’ सध्या सोशल मिडियावर रोमाथी यांच्या जिद्दीचे व धाडसाचे फार कौतुक होत आहे.