Viral Video: तरुणांनाही लाजवेल असा आज्जीबाईंचा नदीत स्वच्छंद पोहतानाचा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, नक्की पाहा
Old Lady Swimming Video (Photo Credits: Twitter)

स्वत:ची आवड, स्वत:चा छंद (Hobbies) जोपासण्यासाठी वयाची गरज आहे. आपली एखादी आवड आपण कुठेही, कधीही पुन्हा करु शकतो. देवाने आपल्याला हा जो जन्म दिला आहे, तो मनसोक्त जगणे हेच या जीवनाचा खरा उद्देश असला पाहिजे प्रत्येकासाठी. त्यामुळे म्हातारपण आलं तरी आपली आवड अगदी मनसोक्त जगणा-या एका आज्जीबाईंचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये या आजीबाई नदीत स्वच्छंदी पोहताना दिसत आहे. काही नवीन शिकण्याची जिद्द असल्यास वय आडवं येत नाही असा मूलमंत्र या आजीबाई (Grandmother) या व्हिडिओ मधून देत आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहून या आजीबाईंचे वय 80 च्याही पुढे असेल असे दिसत आहे. हा कुठल्या तरी गावाकडचा व्हिडिओ आहे. ज्यात या आजीबाई नववारीमध्ये नदीत मनसोक्त पोहताना दिसत आहे. नदीत पोहताना त्यांनी मारलेला सूरसपाटा हा सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे.हेदेखील वाचा- Viral Video: आपल्या मालकाला संकटात पाहताच एका गायीने कमालच केली; पाहा संपूर्ण व्हिडिओ

पाहा व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडिओ शूट करणारा जितका याची मजा घेत आहे त्याच्याहून अधिक मजा या आजीबाई घेताना दिसत आहे. आपल्या वयाचा, दुनियेचा विचार न करता केवळ आपले आयुष्य कसे घालवावे हे या आजींकडून शिकण्यासारखे आहे. आयुष्यात कुठलीही चांगली गोष्ट करायची असेल तर त्याला वयाचे बंधन नसते. केवळ त्यामागची तुमची इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे असा मोलाचा संदेश आजीबाई या व्हिडिओमधून देत आहे. नेटक-यांनीही या व्हिडिओला प्रचंड डोक्यावर घेतले आहे.