Viral Video: आपल्या मालकाला संकटात पाहताच एका गायीने कमालच केली; पाहा संपूर्ण व्हिडिओ

लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडिया (Social Media) वापरकर्त्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर पसंती मिळवण्यासाठी बरेच लोक आकर्षित असे व्हिडिओ टाकत असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका गायीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. या व्हिडिओतील गाय आपल्या मालकाला संकटात पाहून कळपातून धाव टाकते येते आणि त्याची सुटका करते. या व्हिडिओला मोठी पसंती दर्शवली जात आहे. तसेच या व्हिडिओत मालक आणि गायी यांचे एकमेकांवर असलेले प्रेम दिसून आले आहे.

हा व्हिडिओ गुजरातमधील कच्छ येथील आहे. या परिसरात जान मानद नावाचा व्यक्ती परिसरात राहतो. त्याच्याकडे एक ऑटोरिक्षा आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे काही गायीदेखील आहेत. मात्र, या गायीमध्ये जानकडे साई नावाची गायी आहे. या गायीवर त्याचे खूप प्रेम आहे. तसेच त्या गायीचेही जानवर प्रेम आहे. जानच्या एका हाकावर साई त्याच्याकडे धावत पळत येते. हे देखील वाचा- Bhaubeej 2020 Funny Memes: भाऊबीज निमित्त सोशल मीडियावर फनी मीम्स व्हायरल; भावंडांसोबत शेअर करुन उडावा धम्माल!

ट्विट-

महत्वाचे म्हणजे, जान आणि साईच्या प्रेमाची संपूर्ण गावात चर्चा आहे. यामुळे एकदा जानच्या मित्राने त्याची परिक्षा घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान, जानच्या मित्राने त्याचे हात बांधले आणि त्याला मारहाण करत असल्याचे नाटक केले. आपला मालक संकटात आहे हे दिसताच गाय धावतच त्याच्याकडे आली. एवढच नाही तर त्याच्या हाताला बांधलेली दोरीही तिने काढण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.