Bhaubeej 2020 Funny Memes: भाऊबीज निमित्त सोशल मीडियावर फनी मीम्स व्हायरल; भावंडांसोबत शेअर करुन उडावा धम्माल!

भाऊबीजेनिमित्त मिळणाऱ्या या गिफ्ट्सवरुन जोक्स, धम्माल, मस्ती केली जाते. भावा-बहिणीच्या गोतावळ्यात यावरुन हशा पिकतो. आज भाऊबीज निमित्त असेच काही धम्माल जोक्स, मीम्स सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

Bhaubeej 2020 Funny Memes: भाऊबीज निमित्त सोशल मीडियावर फनी मीम्स व्हायरल; भावंडांसोबत शेअर करुन उडावा धम्माल!
Bhaubeej 2020 Funny Memes (Photo Credits: Twitter)

भाऊबीज हा भावा-बहिणीच्या नात्याचा प्रेमळ सण. भाऊबीज निमित्त बहिण भावाला ओवाळते आणि भाऊ ओवाळणीत बहिणीला छानसं गिफ्ट किंवा पैसे देतो. परंतु, भाऊबीजेला भावाकडून नेमकं काय गिफ्ट मिळणार याची उत्सुकता प्रत्येक बहिणीला असते. तर काही बहिणींना भावाने पैसे द्यावे असे वाटते. भाऊबीजेनिमित्त मिळणाऱ्या या गिफ्ट्सवरुन जोक्स, धम्माल, मस्ती केली जाते. भावा-बहिणीच्या गोतावळ्यात यावरुन हशा पिकतो. आज भाऊबीज निमित्त असेच काही धम्माल जोक्स (Jokes), मीम्स (Memes) सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. हे मीम्स तुमच्या भावा-बहिणींसोबत शेअर करुन तुम्ही नात्यात अधिक गंमत आणू शकाल. (भाऊबीज निमित्त SMS, Messages, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून द्या आपल्या भावंडांना खास शुभेच्छा!)

भाऊबीजेदिवशी मजेत काही भाऊ मी गरीब आहे, असं म्हणतात. तर काहीजण रिकामा हिसा दाखवतात. तर बहिणी ओवळणीत पैसे मागतात. या दिवशी भावाला आदरपूर्वक वागणूक देतात. असं तुमच्यापैकी अनेकजण करत असतील. त्यामुळे हे जोक्स तु्म्ही रिलेट करु शकाल किंवा यातील कोणंतरी मीम तुमच्या भावाला-बहिणीला चपलखपणे बसत असेल. त्यामुळे हे मीम्स तुमच्या भावंडांमध्ये शेअर करा आणि धम्माल उडवून द्या.

भाऊबीज फनी मीम्स आणि जोक्स:

एखादा प्रसंग, घटना, सण, उत्सव यावरुन मजेशील मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होणे हा अलिकडचा ट्रेंड झाला आहे. त्यामुळे मीम्सचा आनंद युजर्स आर्वजून घेत असतात. दरम्यान, भाऊबीजेनिमित्त भावा-बहिणीमध्ये गिफ्टची देवाण-घेवाण होते. त्यावरुन सोशल मीडियावर सध्या जबरदस्त जोक्स व्हायरल केले जात आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2020 12:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).