दोन डोक्यांचा साप तुम्ही बघितला आहे का? पहा दोन डोकी सापाचे दुर्मिळ फोटो

दोन डोकी सापाला मराठीत मांडूळ'ला इंग्रजीमध्ये 'रेड सँड बोआ' असे म्हणतात. मांडूळ सापाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. या सापाला एक शरीर आणि दोन डोकी असतात. मऊ जमिनीत राहणार हा साप कोरड्या जागी राहण्यास पसंती दर्शवतो. या सपामुळे काळी जादू करता येतो, अशी लोकांची भारतात अंधश्रद्धा आहे. परदेशातही हा २ डोकी साप विविध भागात आढळतो.

साउथ ऑफ्रिकेतील प्रख्यात सर्पमित्र Nick Evans याने त्याच्या सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्याने दोन डोकी सापाचे दुर्मिळ फोटोसह विलक्षण असा अनुभव शेअर केला आहे.निकने शेअर केलेल्या या फोटोतील साप तपकिरी रंगाचा, अंडी खाणारी आणि विशेष म्हणजे या सापाला दोन डोकी आहेत. निकने या दोन डोकी सापाचे फोटो त्या सोशल मिडीया पेजवर शेअर केले आहेत. निक सांगतो यापूर्वी त्याने दोन तोंडी साप कधीही बघितला नव्हता. या सापाची लांबी सुमारे 30 सेमी असुन या सापाची हालचाल बघणं कुतहुल निर्माण करणारं होत. सापाला वाचवल्याबद्दल निकने रहिवाशाचे आभार मानले आहेत. ( हे ही वाचा : Panipuri Ban in Kathmandu: नेपाळ सरकारने काठमांडूमध्ये पाणीपुरीवर घातली बंदी; जाणून घ्या काय आहे यामागच कारण)

 

भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान या देशांमधील हवामान दोन डोकी सापाला खूपच पोषक आहे. त्यामुळे भारतासह हा साप बऱ्याच आशियाई देशांमध्ये आढळण्याचे  प्रमाण सर्वात जास्त आहे.