Twitter (Photo Credits: IANS)

Twitter Down  Memes:   जगभरात लोकलप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेलं ट्वीटर (Twitter) मागील काही वेळापासून बंद आहे. दरम्यान अनेक युजर्सना अचानक आज (13 मार्च) सकाळी होमपेजवर 'ट्विटर सेवा बंद' असल्याचा मेसेज दिसू लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून हे ट्वीटर डाऊनचे मेसेज पहायला मिळत आहे. "Something went wrong, but don't fret — let's give it another shot." असा मेसेज पहायला मिळत आहे. मात्र आता काही वेळापूर्वीच  ट्वीटर पुन्हा सुरू झालं आहे. ट्वीटरचे सारे पर्याय आता हळूहळू सुरू झाले आहेत.  मागील वर्षी अशाच प्रकारे 17 फेब्रुवारी 2019 दिवशी देखील ट्वीटर 10 मिनिटं बंद पडल्याचं पहायला मिळालं होतं.

 

ट्वीटर डाऊन मिम्स  

 

ट्वीटर डाऊन मिम्स  

ट्वीटर डाऊन मिम्स  

सकाळी ट्विटर डाऊन झाल्याने इमेजेस लोड होत नव्हत्या. तर याप्रकारच्या काही तक्रारी वारंवार युजर्सना पहायला मिळत होत्या. याप्रमाणेच युजर्स ट्वीट शेअर किंवा एम्बेड करू शकत नव्हते. त्यासोबतच रिट्वीटचाही पर्याय उपलब्ध नव्हता. मात्र काही वेळातच आता हळूहळू ट्वीटर पूर्ववत होण्यास सुरूवात होत आहे.