Viral Video | (Photo Credits-Twitter)

सोशल मीडिया (Social Media) म्हणजे चित्र-विचित्र गोष्टींचा खजीनाच. कधी व्हिडिओ, कधी मिम्स तर कधी अजब घटना, घडामोडींचा वेध. यातील अनेक गोष्टी बऱ्याचदा व्हायरल आणि ट्रेंड (Social Media Trendings) होतात. ज्याची जोरदार चर्चा असते. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हायरल व्हिडिओ (Viral Video) जोरदार चर्चेत आहे. जुगाडाचा हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सच्या (Social Media Users) भूवया उंचावल्या आहेत. अनेकांना प्रश्न पडला की व्हिडिओत दिसत आहे तो ट्रक आहे की बाईक. तुम्ही हा व्हिडिओ इथे पाहू शकता.

व्हिडिओत आपण पाहू शकता की एक ट्रक रस्त्यावर चालत आहे. पण जेव्हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहता तेव्हा लक्षात येते की हा ट्रक नव्हे तर ती एक बाईक आहे. पाठीमागून पाहताना सर्वांनाच असे वाटते की, रस्त्यावर ट्रक चालला आहे. कारण हौदात भरलेला माल (लोड) पाहता कोणालाही हा ट्रक असल्याचे वाटणे स्वाभाविक आहे. पण जेव्हा पुडून हा व्हिडिओ पाहिला जातो तेव्हा लक्षात येते की इतके ओझे केवळ एक बाईक ओढत आहे. बाईक चालवताना बाईकस्वारही व्हिडिओत पाहायला मिळतो आहे. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा ही बाईक आहे की ट्रक? (हेही वाचा, Dog Riding Horse: कुत्र्याची घोडेस्वारी, High Jump पाहून सोशल मीडियावर युजर्सनाही वाटले कौतुक (Funny Video Of Animal))

ट्विट

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @fred035schultz नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 63,000 पेक्षाही अधिक युजर्सनी पाहिला आहे.