Rhinoceros Chases Tourist Vehicle in Assam:गुवाहाटी येथील मानस राष्ट्रीय उद्यानाचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या या अभयारण्यात दुर्मिळ वन्यजीव पाहण्यासाठी लोक लांबून येतात. नॅशनल पार्कचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मानस नॅशनल पार्कमध्ये एक गेंडा पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करताना दिसत आहे. खुद्द वनविभागाने उद्यानाच्या व्हिडिओला दुजोरा दिला. मानस राष्ट्रीय उद्यानाचे वन परिक्षेत्र अधिकारी बाबुल ब्रह्मा यांनी सांगितले की, ही घटना डिसेंबरमध्ये घडली. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)