ऑस्ट्रेलियात सापाडला तीन डोळ्यांचा साप
Snake with third eye (Photo Credits: Twitter)

ऑस्ट्रेलिया (Australia) देशातील डार्विन येथे एक दुर्मळ आणि तितकाच विचित्र साप (Snake) आढळला आहे. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे, या सापाला चक्क तीन डोळे ( 3-Eyed Snake) आहेत. रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना रस्त्याच्या कडेला हा साप आढळला.

या सापाचा एक्स-रे काढण्यात आला. त्यात हा साप किशोरवयीन असल्याचे पुढे आले. सापाची लांबी सुमारे 15 इंच इतकी आहे. त्याला इतर सापांप्रमाणे दोन डोळे आहेतच. पण, त्याच्या डोक्यावर दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी तिसरा डोळाही आहे. Northern Territory Parks and Wildlife च्या अधिकृत फेसबुकवरील पोस्टनुसार या सापाचा तिसरा डोळाही कार्यरत आहे.

रेंजर्सने म्हटले आहे की, या सापाचा तिसरा डोळा हा तो अंड्यात भ्रणअवस्थेत असतानाच तयार झाला आहे. अशा प्रकारचे साप हे भ्रुण तयार होताना झालेल्या नैसर्गिक गडबडीमुळे जन्माला येतात. कदाचित हा पर्यावरणीय बदलाचा संकेत असू शकतो. अशा प्रकारचे साप जन्माला येणे हे केवळ दुर्मिळ आहे. (हेही वाचा, व्हर्जिनियात सापडला दोन तोंडाचा साप; सोशल मीडियावर युजर्सच्या तोंडून अगंबाई... अरेच्छा..!)

दरम्यान, काही लोकांनी याचा दुष्काळाशी संबंध लावला आहे. अशा प्रकारचा साप दिसणे हे नजिकच्या काळात दुष्काळ पडण्याचे संकेत असल्याचे म्हटले आहे.