Viral Video: OMG! स्टोअरमध्ये पुरेशी रोकड न मिळाल्याने चोरट्यांनी चोरले चॉकलेट, परफ्यूम आणि फेस वॉश; घटना CCTV मध्ये कैद, पहा
Robbers Steal Chocolates Viral Video (PC - Twitter)

Viral Video: पंजाब (Panjab) मधील अमृतसर (Amritsar)मध्ये तीन सशस्त्र दरोडेखोरांनी एका मेडिकल स्टोअर (Medical Store) मध्ये घुसून बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना मेडिकल स्टोअरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तीन सशस्त्र तरुणांनी दुकानात घुसून बंदुकीच्या जोरावर दुकान लुटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अमृतसरमधील एका मेडिकल स्टोअरमध्ये ही घटना घडली. चेहऱ्यावर मास्क लावलेले तीन तरुण दुकानात घुसले आणि त्यांनी दुकानात काम करणार्‍या कर्मचाऱ्यांवर बंदुकीचा धाक दाखवला. दरोड्याच्या वेळी दुकानात दोन जण उपस्थित होते. दरोडेखोरांना पाहून ते घाबरले आणि ते काउंटरच्या मागे उभे राहिले. दरोडेखोरांनी दुकानात उपस्थित असलेल्या व्यक्तींना कॅश काउंटरमध्ये जी काही रोकड आहे ती देण्यास सांगितले.

दरम्यान, दरोडेखोरांपैकी एकाने काउंटर ओलांडून कॅश काउंटरच्या आत जाऊन रोकड लुटली. दरोडेखोरांनी दुकानावर दरोडा टाकला तेव्हा दुकानात पुरेशी रोकड नव्हती. निराश झाल्यानंतर दरोडेखोरांनी दुकानातील मौल्यवान वस्तू लुटण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चॉकलेट, परफ्यूम, फेस वॉश आणि शॅम्पू गोळा करायला सुरुवात केली. या वस्तू लुटून त्यांनी दुकानातून पळ काढला. ही संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (हेही वाचा - Belly Dancing Inside Mumbai Local Train: चालत्या मुंबई लोकल मध्ये तरूणीच्या Belly Dance चा व्हिडिओ वायरल; नेटकर्‍यांनी वेधलं पोलिसांचं लक्ष)

तथापी, या प्रकरणासंदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंजाबमध्ये दिवसाढवळ्या लुटमारीच्या घटना घडत आहेत. अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी सरकारने आवश्यक ती कार्यवाही करण्याची गरज आहे.