Viral Video: उंटासोबत सेल्फी घेत होती महिला, प्राण्याने केले असे काही तुम्हीही हसून व्हाल लोटपोट
Camel Viral Video (Photo Credits: Twitter)

सेल्फी (Selfi) काढणे हा सर्वांचा आवडीचा छंद झालाय. आपल्या आवडत्या व्यक्तिसोबत, वेगळ्या ठिकाणी अगदी प्राण्यासोबत देखील अनेकांना सेल्फी काढण्याची हौस असते. मात्र हाच सेल्फी कधी कधी त्यांचा घात करतो तर कधी कधी त्यांची फजिती... असाच काहीसा प्रकार घडलाय व्हायरल झालेल्या या व्हिडिओमधील महिलेसोबत. ही महिला एका उंटासोबत सेल्फी काढत होती. त्यावेळी त्या उंटाने त्या महिलेसोबत केले असे काही जे पाहून तुम्हीही हसून लोटपोट व्हाल. उंटासोबत सेल्फी घेतानाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल(Viral Video) होत आहे.

हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी प्रवीण अंगुसामी ने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करुन 'उंटासाठी त्वरित आणि स्वादिष्ट हाय-प्रोटीन नाश्ता' असे कॅप्शन त्यांनी लिहिले आहे. #सेफ्टी फर्स्ट असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.हेदेखील वाचा- Viral Video: छोट्याशा खारूताईचा सापाने अडवला रस्ता, त्यानंतर दोघांमध्ये झालं जबरदस्त भांडण; पहा व्हिडिओ

पाहा व्हायरल व्हिडिओ:

तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल ही महिला बंद पिंज-यातील उंटासोबत सेल्फी घेत आहे. तेव्हा उंटसुद्धा तिच्या जवळ सेल्फी घेण्यासाठी आला. त्याचवेळी अचानक त्या उंटाने त्या महिलेचे केस आपल्या तोंडाने ओढले. इतकच नव्हे तर तर त्या उंटाने तिचे केस एवढ्या जोराने दाताने ओढले की काही केस त्याच्या तोंडात आले. महिला जोरजोरात ओरडते. मात्र हा उंट बिनधास्त तिचे तोंडात आलेले केस नाश्ता समजून रवंथ करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओला आतापर्यंत 1.5K व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ 28 फेब्रुवारीला सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता.