Viral Photo: DSP पदावर कार्यरत असलेल्या आपल्या मुलीला पाहून इन्स्पेक्टर वडिलांनी केला सलाम; पहा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो
Inspector's father saluted seeing his daughter (PC - Twitter)

Viral Photo: प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलापेक्षा आपल्या मुलीने जास्त यश मिळवाव अशी अपेक्षा असते. त्याच्या मुलांचे यश आई-वडिलांसाठी सर्वात मोठा आनंद असतो. असंच एक उदाहरण आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्येही पाहायला मिळालं आहे. डीएसपी कन्येला अभिवादन करताना आंध्र प्रदेश पोलिस (Andhra Pradesh Police) दलात कार्यरत असलेल्या वडिलांचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये सर्कल इंस्पेक्टर श्याम सुंदर नमस्कार मॅडम म्हणत आपल्याचं मुलीला सलाम करताना दिसत आहेत. यावेळी प्रशांतीने देखील आपल्या वडिलांना सलाम केला. हा फोटो पाहून नेटीझन्स वडील आणि मुलीचे कौतुक करीत आहेत. (हेही वाचा - Get Well Soon DADA म्हणत सुदर्शन पटनायक यांनी वाळूशिल्प साकारून सौरव गांगुली ला दिल्या शुभेच्छा!)

आंध्र प्रदेश पोलिसांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट केला आहे. ज्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरस झाला. या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, 'कर्तव्यामुळे एका कुटुंबातील सदस्यांना एकत्र येता आलं. सर्कल इन्स्पेक्टर श्याम सुंदर पोलिसी उपअधीक्षक असलेली आपली मुलगी जेसी प्रशांती यांना सलाम करत आहेत. एक दुर्मिळ आणि भावनिक करणारा क्षण!'

जेसी प्रशांती 2018 बॅचचा पोलिस अधिकारी आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर दक्षिण येथे त्या डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. त्याचे वडील सुंदर हे 1996 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून पोलिस विभागात दाखल झाले. श्याम सुंदर तिरुपती कल्याणी धरण पोलिस प्रशिक्षण केंद्रात सीआय म्हणून तैनात आहेत. कामानिमित्तच्या भेटीदरम्यान दोघांची भेट झाली. त्यावेळी वडील सुंदर यांनी मुलगी प्रशांतीला सलाम केला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.