होणाऱ्या पत्नीचे मेहुण्याशी जुळले सुत; धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने लग्नातच दाखवला दोघांचा अश्लील व्हिडीओ (Watch Video)
Groom exposes bride's affair (Photo Credits: YouTube Grab and Pixabay)

विवाहबाह्य संबंधांमुळे (Extra Marriage Affair) अनेक संसार उध्वस्त झालेले आपण ऐकले असतील. बऱ्याच वेळा ही गोष्ट समोर आली तर ती फक्त पती पत्नी मध्येच राहते किंवा घटस्फोट होऊनही याबाबत कोणी जास्त बोलत नाही. मात्र लग्नाच्याच दिवशी आपले कुटुंबीय, सर्व पाहुण्यांसमोर आपल्या होणाऱ्या पत्नीचे तिच्या मेहुण्यासोबत असलेले संबंध एका पठ्ठ्याने उघडकीस आणले आहेत.

ही घटना चीनच्या फुझियान (Fujian) प्रांतात घडली आहे. आपल्या होणाऱ्या पत्नीचे तिच्या बहिण्याच्या नवऱ्यासोबत ‘तसले’ संबंध आहेत हे या युवकाला माहित होते, मात्र ही गोष्ट सर्वांसोमार आणण्यासाठी आणि या मुलीला धडा शिकवण्यासाठी त्याने लग्नाचे नाटक केले.

पहा व्हिडीओ -

26 डिसेंबर रोजी या वराने, आपल्या लग्नातच होणाऱ्या पत्नीचा तिच्या मेहुण्यासोबतचा बेडरूममधील अश्लील व्हिडीओ एका मोठ्या स्क्रीनवर सर्वांना दाखवला. त्यामुळे या मुलीचे आपल्या गर्भवती असलेल्या बहिण्याच्या नवऱ्याशी संबंध होते ही गोष्ट सर्वांसमोर आली. त्यानंतर या मुलाने आपल्याला ही गोष्ट आधीपासूनच माहित असल्याचे सांगितले. सध्या सोशल मिडीयावर या गोष्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऑनलाईन रिपोर्टनुसार, हे जोडपे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. (हेही वाचा: पार्टनरचे बाहेर अफेअर असल्याचा संशय आहे? जाणून घ्या का ठेवले जातात विवाहबाह्य संबंध)

घराचे नूतनीकरण करताना आपल्या नवीन घरामध्ये या मुलाने सुरक्षेसाठी कॅमेरे लावले होते, यामुळेच ही गोष्ट समोर आली. मात्र चीनी ब्लॉगर जिआंग झे हू बा जी यांनी सांगितले की, या मुलीचा होणारा नवरा तिच्यावर अत्याचार करीत होता. त्यानंतरच हे प्रकरण सुरू झाले. तिने तिच्या मेहुण्याला या घरगुती हिंसाचाराबद्दल सांगितले होते,  आणि त्यानेही तिला आधार द्यायला सुरुवात केली. याच दरम्यान दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेमभावना निर्माण झाली आणि हे प्रकरण इथपर्यंत केले.