चोचीच्या साहाय्याने कचरा उचलणारा कावळा (Photo Credits: Twitter)

Viral Video: सोशल मीडियावर नेहमी विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमधून मानवाला काहीना काहीतरी संदेश दिला जातो. सध्या असाचं एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ संपूर्ण मानवजातीसाठी एक प्रकारचा धडा देणारा ठरला आहे. कधीकधी प्राणी किंवा पक्षी असे कार्य करतात, जे मानवांनासुद्धा विचार करण्यास भाग पाडतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कावळा (Crow) आपल्या चोचीच्या साहाय्याने सभोवताली पडलेला कचरा (Garbage) उचलून जवळचं असलेल्या डस्टबिनमध्ये टाकत आहे. हा व्हिडिओ मानवांना स्वच्छतेचा (Cleanliness) मोठा धडा देणारा आहे. सध्या नेटीझन्सकडून कावळ्याच्या या कृतीचे कौतुक होत आहे. व्हिडिओमधील कावळ्याने सोशल मीडिया युजर्संची मने जिंकली आहेत.

हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी (Indian Forest Service) सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'या कावळ्याला हे ठाऊक आहे की मानवाने त्यांची लाज सोडली आहे.' आतापर्यंत या व्हिडिओला 14.4K व्यूज मिळाले आहेत. हे ट्विट 421 लोकांनी रीट्वीट केले असून 1,939 लोकांनी ते लाईक केले आहे. या व्हिडिओतील कावळ्यांचे हे काम पाहून लोकांनी त्याचे कौतुक केले आहे. (वाचा - अचानक रेल्वे ट्रॅकवर दाखल झालेल्या हत्तीची सैर कॅमेऱ्यात कैद (Watch Viral Video))

दरम्यान, सुमारे 38 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये, एक कावळा आपल्या चोचीच्या साहाय्याने कचरा उचलून तो जवळच्या एक डस्टबिनमध्ये टाकताना दिसत आहे. या कावळ्याने कचराकुंडीजवळ पडलेले सर्व कागद उचलून डस्टबिनमध्ये टाकले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार पाहिला जात आहे. तथापि, कावळ्यांचं हे काम पाहून आपणही आपल्या अवतीभवती असलेला कचरा कमी करण्याची वृत्ती बाळगली पाहिजे.