Thank You Coronavirus Helpers! कोरोनावर मात केलेल्या पुण्याच्या वृद्ध शेतकर्‍याने डॉक्टरांंना पाठवलं हे खास गिफ्ट, नेटकरी करतायत कौतुक
Covid-19 Patient's gesture (Photo Credits: Twitter)

कोरोनाचा (Coronavirus)  उद्रेक सुरु झाल्यापासुन डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील मंंडळी दिवसरात्र काम करत आहेत. सगळ्या जगाला घरी सुरक्षित राहायला सांंगुन स्वतः कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांंवर उपचार करताना ही डॉक्टर मंंडळी आपला जीव धोक्यात घालत आहेत, या योगदानासाठी करावंं तितकंं कौतुक आणि मानावे तितके आभार कमीच आहेत पण पुण्यात अलिकडेच कोरोनावर मात केलेल्या एका वृद्ध शेतकर्‍याने आपली कृतज्ञता अत्यंंत भावनिक पद्धतीने व्यक्त केली आहे. या शेतकर्‍याने आपल्यावर उपचार केलेल्या डॉक्टरांंसाठी स्वतःच्या शेतात स्वतः मेहनत करुन पिकवलेला तांंदुळ पाठवत त्यांंचे आभार मानले आहेत. पुण्याच्या (Pune)  डॉ. उर्वी शुक्ला यांंनी या तांंदळाचा फोटो आपल्या ट्विटर वरुन शेअर करत हे गिफ्ट मिळाल्याचा आनंंद आणि अभिमान वाटतो असे म्हंंटले आहे तर नेटकर्‍यांंनी सुद्धा या शेतकर्‍याच्या भावनेचं कौतुक केलंय.

To All The Coronavirus Helpers Thank You: धन्यवाद कोरोना व्हायरस मदतनीस म्हणत Google चे खास Doodle; डॉक्टर, सफाई कर्मचार्‍यांंचे मानले आभार

उर्वी शुक्ला यांंनी ट्विट मध्ये म्हंंटल्यानुसार, अलिकडेच या वृद्ध शेतकर्‍याने कोरोनावर मात केली. ते जवळपास 15 दिवस हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते त्यांंचे वय आणि गंंभीर तब्येत पाहता त्यांंच्यावर 12 दिवस व्हेंंटिलेटर वर उपचार सुरु होते अखेरीस त्यांंनी जिद्दीने कोरोनावर मात केली आहे. त्यांंना हॉस्पिटलच्या टीमचे आभार मानायचे होते म्हणुन त्यांंनी स्वतःच्या शेतातील तांंदुळ पाठवला आहे.

उर्वी शुक्ला ट्विट

नेटकर्‍यांंच्या प्रतिक्रिया

दरम्यान आपण वरील ट्विट मध्ये पाहुच शकता की या शेतकर्‍याच्या या छोट्याश्या कृतीने सुद्धा नेटकरी भारावुन गेले आहेत. कोरोनाचे संकंंट हे सर्वांंसाठीच नवीन होते अशावेळी वैद्यकीय क्षेत्रावर कामाचा खुप ताण येत आहे, अनेक वैद्यकीय कर्मचार्‍यांंनी या लढ्यात आपले प्राणही गमावले आहेत तरीही मागे न हटता त्यांंनी कोरोना संकट दुर करण्यासाठी घेतलेल्या या पुढाकारासाठी खुप खुप धन्यवाद!