Girl Walking on Building's outer Wall (Photo Credits: Twitter)

सोशल मीडियावरुन एक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओत एक मुलगी टॉवरच्या वरच्या मजल्याच्या बाहेरील कडेवरुन अगदी सहज चालत आहे. ही मुलगी तिसऱ्यांचा हा प्रकार करत असल्याचे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मुलीचे इमारतीच्या बाहेरील कडेवरुन चालणे अतिशय भयानक असून ती असे का करते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या प्रकरणी नेटकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करायला हवी असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ समोरच्या इमारतीतील रहिवाशांनी शूट केला आहे. व्हिडिओ पाहुन सर्वजणच अचंबित झाले आहेत.

दरम्यान हा प्रकार इमारतीतील रहिवाशांच्या लक्षात आला नाही का? ती मुलगी कोण? तिच्या कुटुंबाला या प्रकरणाबद्दल ठाऊक आहे का? असे अनेक प्रश्न व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मनात उपस्थित राहतात. तसंच हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट इमारतीमधील हा व्हिडिओ असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे.

पहा व्हिडिओ:

हा व्हिडिओ Donald Quadros या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला असून ठाणे पोलिस, आमदार एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टॅग केलं आहे. तसंच हा लॉकाडाऊनचा परिणाम आहे असं या युजरने म्हटलं आहे. दरम्यान या मुलीचा शोध पोलिस लवकरच घेतील आणि या प्रकरणामागील सत्य आपल्या समोर येईल, अशी आशा आहे.