जर तुम्हाला सुद्धा व्हॉट्सअॅपवर प्रश्नांची उत्तर देऊन टाटा सफारी (Tata Safari) जिंकण्यासंदर्भात मेसेज आला आहे का? या मध्ये एक लिंक सुद्धा दिली असून त्यात ऑफरचा ही उल्लेख करण्यात आला आहे. या व्हायरल मेसेजमध्ये असे म्हटले आहे की, टाटा मोटर्स कारकडून 30 मिलियनचा सेल झाल्याने तुम्हा टाटा सफारी जिंकण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा मेसेज व्हॉट्सअॅपच नव्हे तर ट्विटरवर ही व्हायरल झाल्याने टाटा सफारी जिंकण्यासाठी लोकांकडून प्रश्नमालिका भरली जात आहे. मात्र व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे.
टाटा मोटर्सच्या या सफारी कार जिंकण्यासाठी खुप जणांकडून प्रश्नमालिका भरल्या जात आहेत. अशातच एका ट्विटर युजर्सने ही त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्याने कंपनीला एक प्रश्न विचारला. त्यात त्याने असे म्हटले की, कार जिंकण्यासाठीची ही ऑफर कंपनीकडूनच दिली जात आहे का? यावर आता कंपनीने त्यांच्या बाजूने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने असे म्हटले की, या मेसेजमध्ये देण्यात आलेल्या लिंकमध्ये एक व्हायरस असून तो तुमचा डेटा चोरी करु शकतो.(नवी C5 Aircross SUV ची भारतात डिलिव्हरी सुरु; खरेदीशिवाय तुम्हाला घरी घेऊन जाता येणार, जाणून घ्या कसे)
Tweet:
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) June 6, 2021
त्यामुळे व्हायरल झालेल्या या मेसेजला बळी न पडण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियात व्हायरल करु नये असे ही त्यांनी म्हटले आहे. ऐवढेच नव्हे तर संशयास्पद लिंक किंवा मेसेज सुरु करुन सुद्धा पाहू नका.
दरम्यान, कंपनीचा सेल 2020 मध्ये 4418 युनिट झाला असावा पण आता तो मे महिन्यात 24,552 युनिटवर पोहचला असेल. कंपनीच्या एप्रिल महिन्याच्या रिपोर्ट्समध्ये त्यांनी असे म्हटले की, ग्लोबल होलसेल Q4FY21 सह जॅग्युआर लँन्ड रोव्हर यांच्या सेलमध्ये 43 टक्क्यांनी वाढ झाली.