नवी C5 Aircross SUV ची भारतात डिलिव्हरी सुरु;  खरेदीशिवाय तुम्हाला घरी घेऊन जाता येणार, जाणून घ्या कसे
C5 aircross suv (Photo Credits-Twitter)

Citroen कडून शुक्रवारी अशी घोषणा करण्यात आली आहे की, त्यांनी भारतीय मार्केटमध्ये नवी C5  Aircross SUV ची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. ही एसयुवी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला 29.30 लाख रुपयांना लॉन्च केली होती. या कारचा लूक अत्यंत स्टायलिश असून त्याचे डिझाइन ग्राहकांना अत्यंत पसंद पडत आहे. भारतात ही एसयुवी7 कॉम्बीनेशनमध्ये लॉन्च केली गेली आहे. यामध्ये 4 बॉडी कलर आणि 3 बाय टोन रुफ ऑप्शन दिले गेले आहेत. तसेच एसयुवी तीन वेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.(सिंगल चार्जमध्ये 250 किमी रेंज देणार Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर, TVS iQube ला देणार टक्कर)

भारतात या एसयुवीच्या डिलिव्हरीसह कंपनीने Citroen Future Sure प्लॅन सुद्धा उतरवला आहे. त्यानुसार इच्छुक ग्राहकांना महिन्याला 49,999 रुपये पेमेंटसह ही कार घरी घेऊन जाता येणार आहे. या पॅकेजमध्ये रुटीन मेंन्टेनन्स, एक्सटेंडेड वॉरंटी, 5 वर्षापर्यंत रोड साइड असिस्टेंट आणि ऑन रोड फायनान्सिंगचा समावेश आहे.(Mahindra XUV700 ठरणार कंपनीची नवी 7 सीटर SUV, प्रीमियम फिचरसह जाणून घ्या काय असणार खास)

Citroen C5 Aircross मध्ये 2.0 लीटरचे चार सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळू शकते. जो 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लैस केला आहे. हे इंजिन फ्रंट व्हिलला पॉवर देणार असून या पॉरट्रेनसह 177 बीएचपीची पॉवर आणि 400Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. तसेच Citroen C5 Aircross चे इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लैस आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, C5 एअरक्रॉस 18.6 kmpl चे मायलेज देण्यास सक्षम आहे. तर फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास ही एसयुवी मध्ये ग्राहकांना एलईडी हेडलॅम्प्स आणि टेललाइट्ससह टॉप-अॅन्ड वेरियंट शाइन मध्ये पॅनारोमिक सनरुफ दिला गेला आहे. या कारची विक्री पूर्णपणे नॉक्ड डाऊन (CKD) किटच्या माध्यमातून केली जाणार आहे.