पुदुचेरी च्या उपराज्यपाल किरण बेदी यांचा अजब दावा; सूर्यातून 'ओम' आवाज येतो या त्यांच्या वक्तव्यामुळे आल्या ट्रोलर्सच्या रडारवर
किरण बेदी (Photo Credits: Twitter, @thekiranbedi)

सूर्यातून 'ओम' म्हटल्याचा आवाज येतो असं कुणी तुम्हाला सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का? नाही ना. पण असा अजब दावा केलाय पुदुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी (Kiran Bedi) यांनी. नासाच्या एक फेक व्हिडिओ शेअर करण्यावरून त्यावर सध्या चर्चेत आल्या आहेत. आज सकाळी त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर पेज वर हा व्हिडिओ शेअर ककेला आहे. ज्यात सूर्य ॐ-ॐ चा जप करत आहे असे दिसत आहे. त्यांच्या या अजब वक्तव्यावर हसावे की रडावे हे नेटक-यांना काही कळलेच नाही.

अखेर अनेक नेटक-यांनी त्यांना ट्रोल करुन त्यांच्या वक्तव्यावर सुंदर मिम्स तयार केले आहेत. खरे पाहता किरण बेदी यांनी जो व्हिडिओ ट्विट केला आहे तो एडिट करुन बनविण्यात आला आहे. खरे पाहता नासा कडून असा कोणताही व्हिडिओ बनविण्यात आलेला नाही. पाहूया तो व्हिडिओ

किरण बेदी यांचे ट्विट: 

हा व्हिडिओ एडिट करुन बनवलेला असून मूळ व्हिडिओ तुम्हाला हवेच्या प्रवाहामुळे नीटसा ऐकायला येणार नाही. मात्र हे लोक सर्व मिळून या गोष्टीचा शोध घेणार आहे.

हेदेखील वाचा- Chandrayaan 2: 'विक्रम लॅंडर' चा ठावठिकाणा NASA पूर्वी 'इस्त्रो' नेच लावला; के सीवन यांचा दावा

यूजर्सचे कमेंट्स:

एका यूजर्सने तर किरण बेदी यांना तुम्ही कोई मिल गया चित्रपटाच्या चाहत्या आहात का असा प्रश्नही विचारला आहे.

प्रामाणिकपणा, निष्ठेने आपले काम अविरतपणे करणा-या किरण बेदी यांचे हे वक्तव्य पाहून लोक आपल्या डोक्यावर हात मारल्याखेरीज राहणार नाही.