रस्त्यावरील सगळेच लोक आश्चर्यचकित झाले जेव्हा तिथे उपस्थित असलेल्या .एका माणसाच्या पिशवीतून आगीचा गोळा बाहेर आला. खरं तर, चीनमध्ये, एक माणूस त्याच्या मित्रासह गर्दीच्या रस्त्यावर फिरत असताना त्याच्या पिशवीत असलेल्या फोनला अचानक आग लागली. हा 51 सेकंदाचा व्हिडिओ बुधवारी साउथ चायना मॉर्निंग पोस्टने शेअर केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. या व्हिडिओमध्ये हे पाहता येईल की तो माणूस एका मुलीबरोबर रस्त्यावर जात आहे. त्याच्या पाठीवर पिशवी आहे, ज्यातुन अचानक आग बाहेर आली. आगीने घाबरून त्या माणसाने आपली पिशवी जमिनीवर टाकली, ज्यामधून ज्वाळा बाहेर येत आहेत.
This is the shocking moment a phone catches fire inside a man’s bag in China. pic.twitter.com/4C5zz8Ov6t
— SCMP News (@SCMPNews) April 20, 2021
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार, एखादा माणूस रस्त्यावर फिरत असताना त्याला स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. पण हा स्फोट कोठे झाला हे त्याला एका क्षणासाठी कळल नाही. मग ताबडतोब त्याला आढळले की त्याच्या बॅगमध्ये स्फोट झाला होता आणि त्याच्या पिशवीत आग होती. त्यांच्या बॅगमध्ये फोन होता, स्फोट झाल्यामुळे त्या पिशविने पेट घेतला.
रिपोर्ट्सनुसार बॅगच्या आत सॅमसंग फोन होता आणि त्या व्यक्तीने 2016 साली हा फोन विकत घेतला होता. तो त्या दिवसांपासून मोबाईलच्या बॅटरीशी संबंधित समस्यांशी झगडत होता. मोबाईल आगीची घटना घडली तेव्हा फोन फेकण्यात आला. मात्र, या घटनेपासून सोशल मीडियावर लोकांना गॉसिपसाठी मुद्दा सापडला आहे. लोक इंटरनेटवर विविध टिप्पण्या यावर देत आहेत.