विद्यार्थ्याला चढला Allu Arjun च्या 'Pushpa' चित्रपटाचा फिव्हर; 10वीच्या पेपरमध्ये लिहिले 'पुष्पा राज, अपुन लिखेगा नहीं साला'
विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका, पुष्पा (PC - Twitter, You Tube)

सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) च्या 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटातील 'अपुन झुकेगा नहीं' या प्रसिद्ध डायलॉगने अनेकांची मने जिंकली. या डायलॉगबद्दल लोकांनी अनेक इंस्टा रील आणि मीम्सही बनवले होते. पण चित्रपटातील डायलॉगने प्रेरित होऊन कोलकाता येथील एका विद्यार्थ्याने आश्चर्य वाटावे असे काम केले आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे दहावीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेच्या पेपरमध्ये चित्रपटाचा प्रसिद्ध डायलॉग लिहिला आहे. आता हा पेपर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर विद्यार्थ्याने 'पुष्पा, पुष्पराज... अपून लिखेगा नही साला' असं लिहिलं आहे. ही उत्तरपत्रिका पाहून लोकांना हसू आवरता येत नाहीये. यावर काही लोक आपल्या प्रतिक्रिया देऊन मुलाचे कौतुक करत आहेत. तसेच या मुलाला घरात मारहाण होण्याची आणि नापास होण्याची भीती नसल्याचे काहींनी कमेंट्स करताना म्हटलं आहे. (हेही वाचा - Viral Video: सर्पमित्रानं चक्क King Cobra ला बाटलीतून पाणी पाजून केलं शांत (Watch Video))

दरम्यान, 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी WB माध्यमिक परीक्षा 2022 मार्चमध्ये आयोजित करण्यात आली होती. कॉपी तपासत असताना शिक्षकाने ती पकडली आणि त्यांनी त्याचा फोटो काढून शेअर केला. याबाबत शाळेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले आहे.

पुष्पा या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने यशाचे अनेक विक्रम मोडले. यासोबतच या चित्रपटातील गाणी आणि डायलॉगही हिट ठरले. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. रिपोर्ट्सनुसार, पुष्पा 2 ची तयारी सुरू झाली आहे.