Student Caught Having Sex During Online Class: ऑनलाईन क्लासदरम्यान सेक्स करताना पकडला गेला विद्यार्थी, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद
| (Photo Credit: Archived, edited, representative images)

कोरोना महामारीचा शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कळात विद्यार्थ्यांना शाळेत, महाविद्यालयात न बोलवता ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. परंतु, ऑनलाईन क्सास सुरु असताना शिक्षकांचे लक्ष विचलित करणे, विद्यार्थ्यांना सोप झाले आहे. याचपार्श्वभूमीवर व्हिएतनाम विद्यापीठाचा एक विद्यार्थी ऑनलाईन क्लास सुरु असताना चक्क सेक्स करताना पकडला गेला आहे. ही घटना ची मिन्ह सिटीची असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थी कॅमेरा बंद करणे विसरल्यामुळे हा संपूर्ण प्रकार प्राध्यापक आणि त्याच्या सर्व वर्गमित्रांनी बघितला आहे.

विद्यार्थांचे वर्तन पाहून आश्चर्यचकीत झालेल्या प्राध्यपाकाने असे म्हटले की, तुला काय वाटले, आपण काय करत आहोत? वर्ग सुरु असताना तुम्ही मैत्रिणीशी संबंध बनवतात आणि आता ऑनलाईन क्लास सुरु झाले तर तुम्ही सेक्स करत आहेत. प्राध्यपकाच्या बोलल्यानंतर विद्यार्थ्याला त्याची चूक कळाली. त्याने लगेच कॅमेरा बंद करून कपडे घालायला धावला. व्हिएतनामी वृत्तपत्र लाओ डोन्गने दिलेल्या वृत्तानुसार विद्यार्थ्याने प्राध्यापक आणि त्याच्या वर्गमित्रांकडे दिलगिरी व्यक्त केली. हे देखील वाचा- गरोदर महिला आणि बाळ अशा दोघांचेही आयुष्य कोविड-19 लसीमुळे वाचवता येऊ शकते- डॉ. एन. के. अरोरा

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वर्गात शिक्षण घेताना योग्य पद्धतीने वागण्याचे स्मरण करून दिले, असे सांगून विद्यापीठाने घटनेची पुष्टी केली. विद्यापीठाने हा व्हिडिओ आणखी शेअर न करण्याचे लोकांना आवाहन केले आहे. या घटनेने आपल्याला श्वेताची नक्की आठवण झाली असेल. तिने ऑनलाइन क्लास दरम्यान माइक चालू ठेवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खळबळ माजवली होती. तिने एका मुलाच्या काही वैयक्तिक तपशीलांवर चर्चा केली होती. ज्याने त्याला गुप्त ठेवण्यास सांगितले होते.