SSC Result 2021 Memes : दहावी निकालाच्या वेबसाईट result.mh-ssc.ac.in, mahahsscboard.in क्रॅश; सोशल मीडीयात मिम्स वायरल
SSC Result 2021| PC: Twitter

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेताच दहावीचे निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावण्यात आले आहेत. शिक्षण मंडळाने सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्याचा यावर्षी दहावीचा निकाल 99.95% लागल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता विषय निहाय मार्क्स आणि टक्केवारी पाहण्यासाठी खुला होणार असल्याचं सांगितलं आहे. पण यावर्षी विक्रमी निकाल लागल्याने ज्या दोन संकेतस्थळांवर निकाल जाहीर करण्यात आला त्यावर मार्क्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉगिंग झाल्याने वेबसाईट क्रॅश झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही निकाल पाहता आला नसल्याने आता त्यांनी शिक्षण मंडळाच्या कारभारावर टीका करत मिम्स वायरल केले आहेत. Maharashtra SSC Result 2021: 10वीचा निकाल जाहीर; mahahsscboard.in वर तुमचे मार्क्स कसे पहाल ऑनलाईन?

शिक्षण मंडळाकडूनही या तांत्रिक बाबीची दखल घेण्यात आली असून संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स लवकरात लवकर पाहता यावेत म्हणून काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. result.mh-ssc.ac.in, आणि mahahsscboard.in या दोन वेबसाईट वर विद्यार्थी मार्क्स पाहू शकणार आहेत पण या दोन्ही साईट्स ओपन होत नसल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही हतबल झाले आहे.

दहावी निकाल 2021 चे वायरल मिम्स

विद्यार्थ्यांच्या भावनांना किंमत नाही?

निकालाची वाट बघातयतं विद्यार्थी

सर्व्हर डाऊन

वैतागले विद्यार्थी

निकाल  कधी येणार

दरम्यान यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 100% लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी 99.84% लागला आहे. निकालात दरवर्षी प्रमाणे यंदा मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने पहिल्यांदाच लावण्यात आलेल्या निकालावर जे विद्यार्थी नाखुष असतील त्यांना आता श्रेणी सुधारण्यासाठी पर्याय देण्यात येणार आहे तर 11वी प्रवेशासाठीदेखील वैकल्पिक सीईटी परीक्षा असणार आहे.