Solar Eclipse Funny Memes (Photo Credits: Twitter)

आज 21 जून रोजी भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) आहे. भारतात ठिकठिकाणी सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो. या ग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीपासून जास्त लांब असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा चंद्राच्या मागून दिसते. ही दृश्य खगोलप्रेमींसाठी खास असले तरी ग्रहणासंबंधित भारतात अनेक गैरसमज प्रचलित आहेत. विशेष म्हणजे इतक्या वर्षांनंतरही भारतात अनेक ठिकाणी ग्रहणासंबंधित रुढी-परंपरांचे पालन केले जाते. यावरुन सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. (मुंबई मध्ये सूर्य ग्रहणाला सुरूवात; इथे पहा लाईव्ह नजराणा)

21 जून रोजी सूर्यग्रहण सकाळी 9.16 वाजता सुरु होईल आणि दुपारी 3.04 मिनिटांनी संपेल. दुपारी 12.10 मिनिटांनी सूर्यग्रहणाचा प्रभाव अधिक तीव्र होईल. ग्रहणाचा सुतक काळ हा ग्रहण सुरु होण्याच्या अर्धा दिवस आधी किंवा 12 तास आधीपासून सुरु होतो आणि ग्रहणाच्या 12 तासानंतर समाप्त होतो. तसंच ग्रहणाचे वेध लागतात त्यानंतर अनेक गोष्टींवर बंधनं घातली जातात. धार्मिक कार्य करणे, खाणे-पिणे टाळले जाते. मंदिरं, धार्मिक स्थळे याकाळात बंद असतात. ग्रहणकाळात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. तर गर्भवती महिलांवर अनेक बंधने घातली जातात. यावरुन सोशल मीडियावर व्हायरल होणारे मजेशीर मीम्स पाहुया...

Solar Eclipse 2020 Funny Memes:

आजकाल अनेक गोष्टींवर मीम्स तयार केले जातात. एखादी गंभीर घटना, गोष्ट देखील मीम्सच्या रुपात हलकी फुलकी होऊन जाते. कोणाच्याही भावना न दुःखवता सोशल मीडियावर सुरु झालेल्या या ट्रेंडचे युजर्स स्वागत करत आहेत. हसण्या-हसवण्यासाठी मीम्स सदैव तप्तर असतात.