Snake Viral Video: सापासोबत मस्ती, महागात पडली, पाहा काय घडलं नेमकं? पाहा व्हिडिओ
Snake Bite | (Photo Credit : Instagram)

साप (Snake) म्हटले की अनेकांना घाबरायला होते. खरे तर साप हा शेतकऱ्याचा आणि पर्यायाने मानवाचा मित्रच मानला जातो. पण, विशारी या गुणामुळे सापाची अनेकांना भीती वाटत असते. ही भीती आणखीच खोल ठरावी, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Snake Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ एका व्यक्तीचा आहे. जो एका सापाला कारणाशिवाय छेडताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे तो या सापाला इतक्या बेजबाबदारपणे छेडतो आहे की, सापाला आक्रमण करावे लागते. ज्यामुळे संबंधित व्यक्तीला पश्चाताप करण्याची वेळ येते. हा व्हिडिओ आपणही पाहू शकता.

सापासोबत कारणाशिवाय छेडछाड करणे आणि तेसुद्धा अत्यंत बेजबाबदारपणे किती भयंकर असू शकते हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत आपण पाहू शकता की एक व्यक्ती सापाला पकडण्याचा प्रयत्न करतो आहे. सापाला पकडण्याचा हा प्रयत्न या व्यक्तीला चांगलाच भोवतो. या व्यक्तीच्या सततच्या त्रासामुळे वैतागलेला साप अत्यंत चपळपणे फीरतो आणि या व्यक्तीच्या हाताला चावतो. हा साप फक्त एक चावा घेऊन थांबत नाही तर वारंवार चावतो. त्या व्यक्तीला अद्दल घडवतो. (हेही वाचा, Nag Nagin Video: रेस्टॉरंटमध्ये रोमान्स करताना नाग-नागीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ world_of_snakes नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओत आपण पाहाल की, एक व्यक्ती सापाला पकडण्याचा किती बेफीकीरपणे प्रयत्न करतो आहे. त्यामुळे चिडलेला साप स्वसंरक्षणासाठी कसा प्रतिकार करतो. आता पर्यंत हा व्हिडिओ 32 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.