Nag Nagin Video: रेस्टॉरंटमध्ये रोमान्स करताना नाग-नागीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद,  सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Nag Nagin Romance Video

साप (Snake) म्हटलं की अनेकांची घाबरगुंडी उडते. सापाचा व्हिडिओ म्हटलं तरीही अनेकांना घाम फुटतो. पण काही मात्र अगदी रसीक असतात. त्यांना साप प्रत्यक्षात आणि व्हिडिओतही पाहायला चांगलेच आवडते. नाग नागिनीचा (Nag Nagin Video) असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटमधील आहे. या रेस्टॉरंटमध्ये एक नाग आणि नागिन प्रणय (Nag Nagin Romance Video) करताना पाहायला मिळते. नाग नागिन प्रणयाचा व्हिडिओ सीसीटाव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत पाहायला मिळते की एकमेकांच्या शरीराला वेटोळे घालून हे नाग नागीण अगदी आनंदाच रोमान्स करत आहेत. त्यांना जगाचा विसर पडला आहे. त्यांच्या आजूबाजूला लोकही दिसतात. काही लोक उभे आहेत तर काही जवळूनच ये जा करतात. या लोकांच्या येण्याजाण्याचा या जोडप्याला (नाग-नागिन) यांना काहीच फरक पडताना दिसत नाही. ते आपले मस्त आपल्याच धुंदीत प्रणयमग्न असल्याचे पाहायला मिळते. आपण येथे हा व्हिडिओ पाहू शकता. (हेही वाचा, Naag- Nagin Monsoon Romance: मान्सूनमध्ये नाग-नागिण रोमान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)

व्हिडिओ

व्हिडिओ पाहून अनेकांना मात्र चांगलाच धक्का बसला आहे. @TheFigen नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 1 मिलियन पेक्षाही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. जवळपास एक मिनिटाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही फूट लांबीचे नाग-नागिनीचे व्हिडिओ अनेकदा आपण चित्रपटांमध्येच पाहतो. पण, प्रत्यक्षात हे दृश्य पाहून अनेकांना धक्का नक्कीच बसला आहे.