Naag- Nagin Monsoon Romance: मान्सूनमध्ये नाग-नागिण रोमान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Naag- Nagin Monsoon Romance | (Image source: Instagram)

पावसाळा आणि प्रणय हा अनेकांसाठी आवडता आणि महत्त्वाचा विषय. प्राण्यांचेही कदाचित तसे असावे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून अनेकांच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे. काही युजर्सनी तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ आहे एका नाग आणि नागिण (Naag- Nagin Monsoon Romance) यांच्या प्रणयाचा. व्हिडिओत दिसते की नाग आणि नागिण (Naag Nagin Video) भर पावसात रोमान्स करत आहेत. त्यांचा रोमान्स (Naag Nagin Romance) पाहून सोशल मीडिया युजर्स मोठ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

श्रावण (Sawan) महिना यंदा आज म्हणजेच 14 जुलैपासून सुरु होत आहे. श्रावणातील पहिला सोमवार 18 जुलै रोजी येत आहे. या दिवशी भगवान शंकर म्हणजेच महादेवाची पूजा केली जाते. भगवान शिवशंकर (Lord Shiv) याचे नाग हे वाहन आहे. त्यामुळेही काही अनेक लोक नाग-नागिणीच्या या रुपाकडे भक्तीभावाने पाहात आहेत. श्रावन महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक पूजा-अर्चा करतात. काही लोक उपवासही करतात. याचेच औचित्य साधत सोशल मीडियावर सापाचे काही फोटोही पाहायला मिळातात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.  (हेही वाचा, जाणून घ्या भारतात आढळणाऱ्या विषारी सापांच्या खास प्रजाती)

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by 🐍SNAKE WORLD🐍 (@snake._.world)

नाग-नागिण (Naag Nagin Video) रोमान्स करताना आपण कदाचित खूप कमी वेळा पाहिले असेल. हा व्हिडिओ पाहून कदाचित आपल्याही अंगावर शहारे येतील. व्हिडिओत पाहायला मळते की, नाग नागिण एकमेकांना वेटोळे घालून बसले आहेत. दोघेही एकमेकांच्या शरीराला वेटोळे घालून घट्ट बसले आहेत आणि हवेत फणा काढून डोलत आहेत. सोशल मीडयावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ snake._.world नावाच्या पेजवरुन अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला दीड हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. युजर्सकडून प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत.