भारतीय रेल्वे नेटवर्क जगातली चौथी सगळ्यात मोठी रेल्वे नेटवर्क आहे. यामध्ये सुमारे 92,950 किलोमीटरचे रेल्वे नेटवर्क पसरले आहे. आणि 7-8 हजार रेल्वे स्थानकं आहेत. यावर अंदाजे 22 हजाराहून अधिक रेल्वे गाड्या धावत असतात. स्टेशनवर गाड्यांची ये-जा सुरू असताना हमखास रेल्वे अनाऊसमेंट होत असते. प्रामुख्याने यात महिलेचा आवाज ऐकायला येत असते. पण वास्तवात हा आवाज महिलेचा वाटत असला तरीही तो एका मुलाचा आहे ज्याने तो महिलेच्या अंदाजात काढला आहे. इंटरनेट वर व्हिडिओ वायरल झाल्यानंतर याबाबतची माहिती समोर आली आहे. महिलेचा वाटत असणारा हा आवाज श्रवण अडोडे (Shravan Adode) चा आहे.
श्रवण अडोडे हा अनेकवर्ष रेल्वे स्टेशन वर होत असलेल्या अनाऊंसमेंट मागील आवाज आहे. हा 24 वर्षीय पुरूष आहे. श्रवणच्या आवाजात रेल्वेच्या अनेक अनाऊसमेंट्स आहेत. आता हा आवाज भारतीय रेल्वेचा आवाज झाला आहे.
View this post on Instagram
श्रवणच्या आवाजातील रेकॉर्डिंग ही डिकिटल स्वरूपात मिक्स करून गरजेनुसार त्यामध्ये शब्द किंवा वाक्य बदलून वापरली जाते. श्रवणने ही माहिती त्याच्या स्वतःच्या इंस्टाग्राम हॅन्डल्स वरूनही दिली आहे. सध्या श्रवण सोशल मीडीयातही कंटेट बनवताना दिसतो. श्रवण हा व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे. त्याने रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.