Shocking Viral Video (संग्रहित संपादित प्रतिमा)

मंगळवारी एका महिलेने रागाच्या भरात एका फेरीवाल्याच्या ठेल्यावरील सर्व फळे (Fruit Vendor) खाली फेकून दिल्याचे दोन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले. एका व्हिडिओमध्ये एक महिला हातगाडीवर ठेवलेली पपई उचलून रस्त्यावर फेकत असल्याचे दिसत आहे. या दरम्यान फेरीवाला पोलिसांना बोलवण्याबाबत बोलत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये महिला संपूर्ण गाडी उलटून टाकते आणि सर्व फळे नाल्यात पडलेली दिसतात. हे दोन्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी ट्विट करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यानंतर पोलीस व प्रशासनाचे पथक दिवसभर या प्रकरणाची माहिती गोळा करत होते. त्यानंतर हे प्रकरण 3 जानेवारी 2022 रोजी पिपलानी येथील छत्रसाल नगरचे असल्याचे निष्पन्न झाले. व्हिडिओमध्ये एक कार दिसत आहे, जी जहांगीराबादची आहे. नंतर त्याच्या नंबरवरून पोलिसांनी कार मालक राजेश तिवारी, रहिवासी, बरखेडी जहांगीराबाद, याला गाठले आणि पुलबोगडा ऐशबाग येथील रहिवासी फेरीवाला अशरफ खान याला पोलीस ठाण्यात बोलावून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली.

बरखेडी जहांगीराबाद येथील रहिवासी राजेश तिवारी यांनी सांगितले की, त्यांचे सासर छत्रसाल नगर पिपलानी येथे आहे, जेथे ते 3 जानेवारी रोजी पत्नी चित्ररेखा तिवारीसोबत गेले होते. रस्त्यावर त्यांनी आपली कार उभी केली होती. त्यावेळी पपई विकणाऱ्या एका हातगाडीची त्यांच्या गाडीला चुकून धडक बसली. तेव्हा चित्ररेखा बाहेर आली आणि तिने त्याचा निषेध नोंदवला. त्यावर फेरीवाल्याने माफी मागत झालेले नुकसान भरून देतो असे सांगितले. मात्र संतापलेल्या चित्रलेखाने हातगाडीवरून पपई फेकून देण्यास सुरुवात केली. (हेही वाचा: सहा सिंहींणींसोबत एकटी चालतेय तरूणी; वायरल व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क (Watch Viral Video)

त्यानंतर या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच, दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी दोन्ही पक्षांनी हे प्रकरण सामंजस्याने मिटवण्याचे ठरवले. राजेश तिवारी सांगतात की, त्यांच्या वतीने फेरीवाल्याला दोन हजार नुकसान भरपाई देण्यात आली. याबाबत त्यांच्या पत्नीने माफीही मागितली होती. अश्रफने देखील आपल्याला पैसे मिळाल्याचे सांगितले व हे प्रकरण मिटवले.