Shocking Video: रेल्वे पटरीवर विमान क्रॅश; जीवाच्या अकांताने पायलट बाहेर पडतानाच आली ट्रेन, काय घडले पुढे? (पाहा व्हिडिओ)
Plane Crashes on Railway Tracks | (photo Credit - Twitter)

अमेरिकेतील (USA) कॅलिफॉर्निया (California) येथे एक अत्यंत धक्कादायक तितकीच भयावह घटना पाहायला मिळाली. एक विमान चक्क रेल्वे रुळांवरच क्रॅश (Plane Crashes on Railway Tracks) झाले. या विमानातून वैमानिक जीवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, समोरुन एक ट्रेन वेगाने आली. ही ट्रेन विमानाला धडक देणार इतक्यात एक पोलीस कर्मचारी देवदुतासाराखा धाऊन आला. त्याने काही क्षणांमध्ये पायलटला विमानाबाहेर खेचले. ज्यामुळे त्या पायलटचे (वैमानिक) प्राण वाचले. अंगावर रोमांच उभे करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ आपणास विचलीत करु शकतो.

सुरुवातीचे काही सेंकंद व्हिडिओ पाहून लक्षात येत नाही की नेमके काय सुरु आहे. मात्र, पुढच्या काही क्षणांमध्येच पाहायला मिळते की एका जखमी व्यक्तीला काही पोलीस विमानाबाहेर कारण्याचा प्रयत्न करत आहेत. 'जाओ..जाओ..जाओ' असे ओरडतानाचा आवाजही कानावर पडतो. हे लोक पायलटला विमानाबाहेर खेचतात आणि पुढे डोळ्यांची पापणी लवते न लवते इतक्यात एक ट्रेन सुस्साट वेगाने हॉर्न देत येते आणि विमानाला धडक देऊन निघूनही जाते. या धक्कादायक घटनेत अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र, पायलट सुरक्षीत वाचतो. (हेही वाचा, Railway Accident: धावत्या ट्रेनमधून नदीत कोसळल्याने 18 महिन्यांच्या बाळासह आईचा मृत्यू, भंडारा येथील घटना)

प्राप्त माहितीनुसार, ही दुर्घटना कॅलिफॉर्निया येथील लॉज एंजिल्स इथल्या पाकोइमा शेजारील व्हाइटमॅन विमानतळवर रनवेला समांतर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर घडली. लॉस एंजिल्स पोलीस (PLPD) पोलिसांनी हा व्हिडिो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ 3.4 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर अनेकांनी कॉमेंट केली आहे. तर काहींनी व्हिडिओ लाईक करत शेअरही केला आहे.

ट्विट

विमान अपघातानंतर मदत आणि बचाव कार्यात सहभागी असलेले एक अधिकारी डेमियन कास्त्रो यांनी सीएनएन या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, त्यांच्या जवळ विचार करण्यासाठी वेळच नव्हता. त्यामुळे त्यांनी वास्तव स्वीकारुन तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. ज्यामुळे पायलटचे प्राण वाचले.