रेलिंगला लटकून व्यायाम (संग्रहित संपादित प्रतिमा)

या आधी फरीदाबाद (Faridabad) येथे एका महिलेने तिच्या 10-12 वर्षांच्या मुलाला साडीने बांधून दहाव्या मजल्यावरून खाली नवव्या मजल्यावर सोडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. खालच्या मजल्यावर पडलेला कपडा परत घेण्यासाठी हा मुलगा खाली उतरला होता. आता फरिदाबादच्या बहुमजली इमारतींमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा एक धोकादायक पराक्रम पाहायला मिळाला आहे. याठिकाणी 12 व्या मजल्यावरील बाल्कनीतून लटकून व्यायाम करतानाचा एका तरुणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ ग्रेटर फरीदाबाद सेक्टर-82 च्या ग्रॅंड्युरा सोसायटीच्या ई-ब्लॉकचा आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती 12 व्या मजल्यावरच्या बाल्कनीला लटकून व्यायाम करताना स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सोसायटीच्या 12 व्या मजल्याच्या बाल्कनीची बाहेरच्या साईडने रेलिंग पकडून विविध प्रकारे व्यायाम करत आहे. यादरम्यान फ्लॅटच्या आतून एक मुलगा येतो आणि लटकलेल्या व्यक्तीला आत घेऊन जातो. (हेही वाचा: Shocking! आईने मुलाला साडीने बांधून दहाव्या मजल्यावरून खाली सोडले; समोर आले धक्कादायक कारण)

त्याच्या समोरच्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हा धोकादायक स्टंट आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. सोसायटीचे अध्यक्ष दीपक मलिक यांनी सांगितले की, ही 56 वर्षीय व्यक्ती मानसिकदृष्ट्या विकलांग आहे. त्यांना 28 वर्षांचा मुलगाही आहे. या घटनेनंतर आरडब्ल्यूएच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरमालकाला या कुटुंबाला सदनिका रिकामी करण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास पुढील कारवाई केली जाईल.