Shocking! आईने मुलाला साडीने बांधून दहाव्या मजल्यावरून खाली सोडले; समोर आले धक्कादायक कारण (Viral Video)
आईने मुलाला 10 व्या मजल्यावरून खाली सोडले (संग्रहित संपादित प्रतिमा)

एखाद्या आईसाठी (Mother) अधिक मौल्यवान काय असू शकते? स्वतःचा पोटचा गोळा की कपड्याचा तुकडा? दिल्लीशेजारील फरिदाबाद (Faridabad) येथून समोर आलेला हा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला याच प्रश्नाबाबत विचार करायला भाग पडेल. ही घटना आहे फरिदाबादच्या सेक्टर 82 च्या फ्लोरिडा सोसायटीमधील. या ठिकाणी एका महिलेने तिच्या 10-12 वर्षांच्या मुलाला साडीने बांधून दहाव्या मजल्यावरून नवव्या मजल्यावर सोडले. यामागे कारण काय होते? तर या महिलेचा एक कपडा खाली पडला होता तो तिला परत हवा होता.

महिलेने तिच्या बाल्कनीत कपडे सुकवण्यासाठी टाकले होते. यातील एक कपडा 9 व्या मजल्यावरील बाल्कनीत पडला होता. त्या खालच्या घराला कुलूप होते, त्यामुळे कपडा परत मिळवण्यासाठी महिलेने आपल्या मुलाचा जीव धोक्यात घातला. तिने आपल्या मुलाला एका साडीला लटकावले आणि त्याला खालच्या मजल्यावर सोडले. यावेळी या कृत्यामध्ये तिच्यासोबत इतर महिलाही सामील होत्या. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना 6 किंवा 7 फेब्रुवारीची असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोसायटी व्यवस्थापनाने महिलेला या कृत्यासाठी नोटीस बजावली आहे. महिलेला आता तिच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलगा म्हणतो की, एक दिवस सर्वांना मरायचे आहे. आईने माफी मागितली असून, कोणीतरी याचा व्हिडिओ बनवत आहे हे आपल्याला माहित नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस प्रवक्ते सुबे सिंह यांनी सांगितले. व्हिडिओच्या सत्यतेची माहिती गोळा केली जात आहे.